• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आंधळा असूनही क्षणार्धात शेफनं अनोख्या पद्धतीनं कापली काकडी; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

आंधळा असूनही क्षणार्धात शेफनं अनोख्या पद्धतीनं कापली काकडी; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

सध्या एका आंधळ्या कूकचा व्हिडिओ समोर आला असून त्याचा भाजी कापण्याचा अंदाज पाहून सगळेच अवाक झाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) असे काही व्हिडिओ (Shocking Videos) समोर येतात जे सर्वांनाच हैराण करणारे असतात. अनेकदा तर हे व्हिडिओ असे असतात जे पाहून पहिल्या नजरेत तर तुमचा यावर विश्वासही बसणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की एक आंधळा शेफ असं काही करतो, जे पाहून भलभले कूकही अवाक होतील (Blind Chef With Knife Skills). याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की किचनमध्ये कूक चाकूचा वापर अतिशय सावधपणे करतात. जेणेकरून भाज्या कापताना त्यांच्यासोबत काही दुर्घटना घडू नये. मात्र कूक जर आंधळा असेल तर? अशा परिस्थितीत किचनमध्ये त्याच्यासोबत काम करणारे इतर लोक या व्यक्तीला भाजीपाला कापण्यापासून नक्कीच लांब ठेवतील. मात्र सध्या एका आंधळ्या कूकचा व्हिडिओ समोर आला असून त्याचा भाजी कापण्याचा अंदाज पाहून सगळेच अवाक झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा शेफ आधी काकडी हातात घेतो आणि काकडीच्या वरील साल काढून तो आतील भाग वेगळा करतो. तो यानंतर अतिशय सहज लहान लहान भागात काकडीचे तुकडे करतो आणि तेही अगदी कमी वेळात. सोशल मीडियावर लोक या कूकची कलाकारी पाहून हैराण झाले आहेत. यूजर्स कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की अशा प्रकारची कलाकारी दाखवण्यासाठी अतिशय अनुभवाची गरज आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, दुसऱ्या साथीदारानं त्याची मदत करायला हवी. अन्यथा काहीतरी दुर्घटना घडू शकते. आणखी एकानं लिहिलं की मला तर हा व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड वाटत आहे. इतरही अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा धुमाकूळ हा हैराण करणारा व्हिडिओ फेसबुक यूजर Ikbal Khanने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 34 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: