मराठी बातम्या /बातम्या /Viral /

याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video

याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video

व्हायरल होणारा हा व्हिडिओ रिकाम्या रस्त्यावर शूट केला गेला आहे. यात अनेक हत्ती नवजात पिल्लाच्या दोन्ही बाजूने उभा राहिले असून त्याचं रक्षण करताना दिसत आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : जगातील प्रत्येक कुटुंबातील मोठे सदस्य (Family) आपल्या कुटुंबातील इतरांची काळजी घेण्यासाठी तत्पर राहतात. कुटुंबातील मोठे लोक आपल्या कुटुंबातील लहानांची पुरेपर काळजी घेत असतात. लहानांच्या खाण्या-पिण्यापासून त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये, याची पुरेपुर काळजी घरातील सदस्य घेत असतात. कुटुंबातील ही पद्धत फक्त माणसांच्यातच नव्हे तर प्राण्यांच्यातही पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Cute Video of Elephants) होत आहे. यात हत्तीचं एक कुटुंब नवजात पिल्लाची सुरक्षा करताना दिसतं.

संघर्षमय आयुष्याचा भयावह शेवट; रस्त्याच्या कडेलाच सोडला जीव, मृत्यूचा Live Video

व्हायरल होणारा हा व्हिडिओ रिकाम्या रस्त्यावर शूट केला गेला आहे. यात अनेक हत्ती नवजात पिल्लाच्या दोन्ही बाजूने उभा राहिले असून त्याचं रक्षण करताना दिसत आहेत. हत्तीचं हे पिल्लू अतिशय आरामात आपल्या परिवारातील मोठ्या हत्तींसोबत चालताना दिसत आहे. हत्तींचा हा कळप रस्त्यावरून चालत जंगलाकडे गेला.

हा क्यूट व्हिडिओ ट्विटरवर राजीव गोयल यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत हजारो वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ शेअर करत राजीव गोयल यांनी लिहिलं, की या म्हणतात Z +++ सिक्योरिटी. भारतात Z + सिक्योरिटी महत्त्वाच्या लोकांना दिली जाते. यात 55 गार्ड्स दिले जातात. यात दहाहून अधिक NSG कमांडो आणि पोलीस अधिकारी सामील असतात.

2 सिंहिंणींचा सिंहावर हल्ला, Viral Video पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

भारतातील सिक्योरिटी सर्व्हिसबद्दल बोलायचं झाल्यास याची सुरुवात X कॅटेगरीपासून होते. यात फक्त दोन गार्ड्स असतात. यात कोणीही कमांडो नसतो. केवळ पोलीस अधिकारी असतात. भारतात पंतप्रधानांना SPG कॅटेगिरीची सुरक्षा दिली जाते. याशिवाय Y, Y+ आणि Z कॅटेगिरीही सामील आहे.

First published:

Tags: Elephant, Video Viral On Social Media