• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एअऱ होस्टेस बॉलिवूडच्या ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर डान्स करताना दिसते. एअऱ होस्टेसच्या या व्हिडिओ आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : इंटरनेटवर सतत कोणता ना कोणता व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असतो. हे व्हिडिओ अनेकदा हैराण करणारे असतात तर अनेकदा हेच व्हिडिओ आपलं मन जिंकतात. विशेषतः डान्स व्हिडिओजला यूजर्सची विशेष पसंती मिळते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असा एक अतिशय खास डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. हा डान्स व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य खुलेल. महिला पोलीस झाली ‘बाहुबली’, बेशुद्ध नागरिकाला घेतलं खांद्यावर; पाहा Video व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस बॉलिवूड सिनेमातील गाण्यावर ठुमके लगावताना दिसते (Dance Video of Air Hostess). क्लिप पाहून असं वाटतं, की ही होस्टेस आपल्या डान्सचा पुरेपुर आनंद घेत आहे. हा व्हिडिओ बोर्डिंग ब्रिजवर बनवला गेला आहे. याचा वापर प्रवासी आपल्या फ्लाईटमध्ये जाण्यासाठी आणि फ्लाईटमधून बाहेर येण्यासाठी करतात.
  View this post on Instagram

  A post shared by Uma Meenakshi (@yamtha.uma)

  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एअऱ होस्टेस बॉलिवूडच्या ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर डान्स करताना दिसते. एअऱ होस्टेसच्या या व्हिडिओ आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, वाह यांचा डान्स अतिशय सुंदर आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, आयुष्य जगण्याची पद्धत. तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, प्रत्येकाला आपलं आयुष्य एन्जॉय करण्याचा हक्क आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. Shocking Video : ऑडीचा हाहाकार, दुचाकींना उडवित झोपडपट्टीमध्ये शिरली भरधाव कार या एअर होस्टेसचं नाव मिनाक्षी असल्याचं सांगितलं जात आहे. याआधीही तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ही तरुणी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर भरपूर सक्रीय राहते. सतत ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. याआधीही इंडिगो एअरलाईन्सची एक एअर होस्टेस रिकाम्या फ्लाईटमध्ये ‘माणिके मगे हिते’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आयत उर्फ आफरीन हिने अतिशय सुंदर डान्स केला होता. हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: