जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सोशल मीडियावर हत्तीच्या (Angry Elephant) तांडवाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ (Viral Video of Elephant) पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 जुलै : हत्तीचं (Elephant) नाव ऐकताच आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात किंवा एक प्रकारची भीतीच वाटू लागते. मात्र, याच हत्तीचा सामना करण्याची वेळ तुमच्यावर आली तर? अनेकदा या प्रसंगातून नशीब चांगलं असलेले लोक सुखरुप परत येतात. मात्र, काही वेळा याचे अत्यंत घातक परिणामही पाहायला मिळतात. सोशल मीडियावर (Social Media) हत्तीच्या (Angry Elephant) तांडवाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ (Viral Video of Elephant) पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल. साडी नेसून हुलाहुप्स; पाहा कमाल VIDEO! सोशल मीडिया मराठमोळ्या मुलीने गाजवला आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर इतके भयंकर असतात की ते पाहून नेटकरीही हैराण होऊन जातात. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओदेखील असाच आहे. यामध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे एक विशाल हत्ती शहरी भागात घुसून नुकसान करत आहे. हत्तीच्या चारही बाजूनं लोक उपस्थित आहेत आणि तो मात्र सामानाची तोडफोड करण्यात व्यग्र आहे. लोक इच्छा असतानाही त्याला थांबवू शकत नाहीत. कारण हत्तीसोबत पंगा घेणं म्हणजे हातानं मृत्यूला आमंत्रण देणं.

जाहिरात

पोहता येत नसेल तरी ‘या’ समुद्रात बिनधास्त घ्या उडी; बुडण्याची शक्यताच नाही हा व्हिडिओ पाहूनच हत्तीनं माजवलेल्या दहशतीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. safarismyjam नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ आठ हजाराहून अधिकांनी लाईक केला आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसंच अनेकांनी हा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात