मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! पोहता येत नसेल तरी 'या' समुद्रात बिनधास्त घ्या उडी; बुडण्याची शक्यताच नाही

काय सांगता! पोहता येत नसेल तरी 'या' समुद्रात बिनधास्त घ्या उडी; बुडण्याची शक्यताच नाही

पोहता न येणारा माणूसदेखील या समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.

पोहता न येणारा माणूसदेखील या समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.

पोहता न येणारा माणूसदेखील या समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.

  जेरुसलेम, 06 जुलै : उधाणलेल्या समुद्राच्या (Sea) लाटांवर स्वार होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं; पण पोहता येत नसेल तर कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. पोहता येत नसल्यानं अनेक जण खोल समुद्रात शिरून पोहण्याची मजा घेऊ शकत नाहीत; पण अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं अशी एक जागा जगात आहे. निसर्गाच्या अनेक आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा एक समुद्र आहे, ज्यात कोणीही बुडू शकत नाही, अगदी ठरवलं तरी. त्यामुळे पोहता न येणारा माणूसदेखील या समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.

  सुमारे 3 लाख वर्षं जुना असलेला हा समुद्र आशियाच्या (Asia) नैर्ऋत्य भागात इस्रायल आणि जॉर्डन यांच्या दरम्यान आहे. या समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यानं यातले पाण्याचे प्रवाह खालून वरच्या दिशेनं असतात. त्यामुळे या समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी जमिनीप्रमाणे आडवं झोपताही येतं. त्यामुळे इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. 'झी न्यूज'ने याबाबत माहिती दिली आहे.

  हे वाचा - 13 MP कॅमेरा असलेलं जगातलं पहिलं स्मार्टवॉच झालं लाँच; 5 हजार रुपयांचा डिस्काउंट

  या समुद्राचं नाव आहे डेड सी अर्थात मृत समुद्र (Dead Sea). नाव थोडं विचित्र वाटतं ना; पण या समुद्रात कोणतीही वनस्पती उगवू शकत नाही की कोणताही जीव टिकू शकत नाही. याचं मुख्य कारण आहे ते या समुद्राच्या पाण्यात अति प्रमाणात असलेले क्षार. त्यामुळे या समुद्रात मासे (Fish) किंवा इतर प्राणी नसतात. म्हणूनच याला डेड सी अर्थात मृत समुद्र म्हणतात. या पाण्यात पोटॅश, ब्रोमाइड, झिंक, सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखी खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे यातून काढलेलं मीठ आहारात वापरता येत नाही. अति खारटपणासाठीही (Salt) मृत समुद्र जगभरात प्रसिद्ध आहे. इतर समुद्रांपेक्षा या समुद्राचं पाणी 33 टक्के जास्त क्षारयुक्त आहे. त्यामुळे या समुद्राच्या पाण्यात आंघोळ केल्यानं बरेच रोग दूर होतात. या समुद्रातली मातीदेखील गुणकारी आहे. यातली चिकणमाती विविध सौंदर्यप्रसाधनं तयार करण्यासाठी वापरली जाते.

  वाळवंटी भागात असलेला हा मृत समुद्र म्हणजे पृथ्वीवरच्या सर्वांत खालच्या पातळीवरचा पाणीसाठा असून, तो समुद्रसपाटीपासून 1388 फूट खाली आहे. जगातला सर्वांत खोल खाऱ्या पाण्याचा तलाव म्हणून हा समुद्र ओळखला जातो. हा समुद्र चहूबाजूंनी जमिनीनं वेढलेला असून, जॉर्डन (Jordon) ही एकमेव नदी याला येऊन मिळते. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या समुद्राच्या पाण्याची पातळी समुद्रसपाटीपेक्षा 1300 फूट खोल होती; मात्र जॉर्डन नदीचं पाणी व्यावसायिक वापरासाठी वळवण्यात आल्यानं या मृत समुद्राची पातळी घटून 2010 च्या सुमारास समुद्रसपाटीपेक्षा 1410 फूट खाली गेली आहे. या समुद्राची पातळी दर वर्षी तीन फुटांनी घसरत असल्याचं आढळत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Sea