Home /News /viral /

अफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; 254 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO

अफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; 254 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO

आता अफगाणिस्तानकडून एक व्हिडिओ (Airstrike Video) शेअर करण्यात आला आहे. यात तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक (Afghanistan Airstrike) केल्याचं पाहायला मिळत आहे.

    कंधार 02 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. अमेरिकनं आपलं सैन्य (American Army) माघारी घेतल्यापासून तालिबान सातत्यानं हल्ले करत आहे. तालिबान (Taliban) असाही दावा करत आहे, की त्यांनी तिथल्या 90 टक्क्याहून अधिक भागावर कब्जा केला आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या सैन्याकडूनही वारंवार हे सांगण्यात येत आहे, की ते तालिबानवर सातत्यानं हल्ले करत आहेत. रविवारी अफगाणिस्तानकडून असा दावा केला गेला, की त्यांनी तालिबानच्या 254 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यादरम्यान आता अफगाणिस्तानकडून एक व्हिडिओ (Airstrike Video) शेअर करण्यात आला आहे. यात तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक (Afghanistan Airstrike) केल्याचं पाहायला मिळत आहे. ''तुमच्यात मर्दानगी असेल तर अंगावर या; बोला, येताय अंगावर?'' 6 सेकंदाचा हा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पाहायला मिळतं, की समोर अनेक इमारती आहेत, ज्या एखाद्या कॅम्पसप्रमाणे दिसत आहेत. अफगाणिस्तानचा दावा आहे, की अथे तालिबानी दहशतवादी लपले होते. व्हिडिओमध्ये दिसतं, की इमारतींवर अफगाणिस्तानकडून एअर स्ट्राइक केलं जातं आणि अवघ्या सेकंदातच सगळं काही जमीनदोस्त होतं. अफगाणिस्तानचा असा दावा आहे, की या परिसरात तालिबानचे अनेक आतंकवादी मारले गेले. गणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती मागील 24 तासांमध्ये गजनी, कंधार, हेरात, फराह, जोजजान, बल्ख, समांगन, हेलमंद, तखर, कुंदुज, बगलान, काबुल आणि कपिसा याठिकाणी ऑपरेशनमध्ये 254 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. सोबतच 97 जखमी आहेत. असं म्हटलं जात आहे, की ग्रामीण क्षेत्रांमधील मोठमोठ्या ठिकाणांवर कब्जा केल्यानंतर तालिबानींनी आता राज्याच्या राजधान्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, AIR STRIKE, Taliban, Video viral

    पुढील बातम्या