• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शिवसेना भवनाशी पंगा घेऊन येणारा अजून जन्माला यायचाय; बोला, येताय अंगावर? 'सामना'तून थेट सवाल

शिवसेना भवनाशी पंगा घेऊन येणारा अजून जन्माला यायचाय; बोला, येताय अंगावर? 'सामना'तून थेट सवाल

Saamana Editorial: प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसैनिक भलतेच संतापले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र (shiv sena mouthpiece saamana) असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून लाड यांच्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट: भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)यांनी वेळ आल्यास शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र (shiv sena mouthpiece saamana) असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा थेट इशाराच संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना दिला आहे. शिवसेना भवनाकडे ज्यांनी वाकड्या नजरेनं पाहिले ते वरळीच्या गटारात वाहून कायमचे नामशेष झाले, असं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना भवन मराठी माणसांच्या अस्मितेचं प्रतीक, असल्याचं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे. बोला, येताय अंगावर? असा थेट सवाल 'सामना'तून भाजपला करण्यात आला आहे. VIDEO - अरे हिला आवरा! कॅमेरा दिसताच सुरू झाला नवरीचा नखरा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच... असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर. पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे. आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. मराठी माणसांच्या न्याय्य , आशा – आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना ! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले ( बाटगे ) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही.
  Published by:Pooja Vichare
  First published: