जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मालकासाठी श्वानाने जे केलं ते पाहून नेटकरी झाले अवाक; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

मालकासाठी श्वानाने जे केलं ते पाहून नेटकरी झाले अवाक; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

श्वानाने केली मालकाची मदत

श्वानाने केली मालकाची मदत

एक काळ्या रंगाचं पिल्लू आपल्या पुढच्या दोन्ही पायांनी बाहेर आलेली माती मागे ढकलताना दिसत आहे. त्याचे पाय खूपच लहान आहेत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 जून : माणूस आणि प्राणी यांचं नातं खूप खास आहे, असं म्हटलं जातं. दोघंही एकमेकांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कुत्रा हा असा प्राणी आहे, की एकदा का तुम्ही त्यांना आपलंसं केलं की ते आयुष्यभर तुमचेच राहतात. याचा पुरावा एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ हृदयाला स्पर्श करणारा आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू एका व्यक्तीला माती खोदण्यास मदत करत असल्याचं पाहायला मिळतं. त्याला फारशी मदत करता येत नाही, पण त्याचा छोटासा प्रयत्नही खूप मोठा वाटतो. हत्तींना इतके मोठे कान का असतात? यामागे एक नाही अनेक कारणं @goodnews_movement नावाच्या Instagram अकाऊंटवर अनेकदा खास व्हिडिओ पोस्ट केले जातात. या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू एका मजुराला माती खोदण्यात मदत करताना दिसत आहे. कुत्र्यांना त्यांच्या पुढच्या दोन पायाची माती काढताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. हे पिल्लूही तेच काम करताना दिसत आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये एक मजूर जमिनीत बनवलेल्या खड्ड्यात शिरलेला दिसतो. तो फावड्याने माती बाहेर फेकत आहे. त्याच्या शेजारी उभा असलेलं एक काळ्या रंगाचं पिल्लू आपल्या पुढच्या दोन्ही पायांनी बाहेर आलेली माती मागे ढकलताना दिसत आहे. त्याचे पाय खूपच लहान आहेत, त्याला जास्त माती काढता येत नाही. परंतु तरीही तो माती काढून मजुराला मदत करण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की मी घर साफ करत असताना माझा कुत्रा बाजूलाही होत नाही आणि हा कुत्रा इतकं काम करतोय. दुसऱ्याने म्हटलं, की कुत्रा कदाचित खाण्यासाठी हाडं शोधत आहे. तिसऱ्याने सांगितलं, की त्यालाही असा कुत्रा हवा होता. आणखी एकाने म्हटलं, की कुत्र्यालाही त्याच्या कामासाठी पैसे द्यावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात