जगातील सर्वात मोठे कान हे हत्तीचे आहेत. हत्ती बलाढ्य प्राणी तर आहेच. पण त्याचे कान देखील खूपच मोठे आहेत.
पण कधी विचार केलाय का की हत्तीला एवढे मोठे कान का असतात? खरंतर मोठे कान असण्याचे खूप फायदे आहेत. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
सर्वात मोठे कान असलेल्या हत्तींच्या यादीत आफ्रिकेतील हत्ती अव्वल आहेत. त्यांचे कान सर्वात मोठे आहेत.
मोठ्या कानांमुळे हत्तीला लांबचं ऐकायला येतं, ज्यामुळे हत्तींना आधीच येणाऱ्या संकटाची जाणीव होते, ज्यामुळे ते स्वत:चं संरक्षण करु शकतात.
हत्तीला तुम्ही दिवसभर कान हलवताना पाहिले असेल. पण हत्तीचे कान हलवणे नैसर्गिक नसून त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. हत्ती आपल्या महाकाय शरीराची उष्णता कानातून बाहेर काढतो. यामुळे त्याला आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत होते.
उष्णताच नाही तर हत्तीचे कानही त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रित करतात. आफ्रिकेत अति उष्णतेमुळे तेथील हत्तींचे कान खूप मोठे असतात.