लोनॅटो, 06 ऑक्टोबर : एफआयए वर्ल्ड कार्टिंग चॅम्पियनशिप रेस (FIA World Karting Championship Race) दरम्यान ल्युका कॉर्बेरी(Luca Corberi) या रेसरनं आपल्या प्रतिस्पर्धी रेसवर हल्ला केला. या प्रकारानंतर रेसिंग जगाला हादरा बसला आहे. 9 व्या लॅपमधून बाहेर पडल्यानंतर ल्युका रागात ट्रॅकच्या शेजारीच उभा होता. लुका माघारी न जाता आपल्या गाडीचा बम्पर उचलून त्यानं प्रतिस्पर्धीवर मारला. ल्युका साथीदार रेसर पावलो इपोलिटो येण्याची वाट पाहत बसला. त्यांची गाडी जवळ येताच ल्युकानं बम्पर फेकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एवढंच करून ल्युका थांबला नाही तर रेस संपल्यानंतर ल्यूकानं पावलोवर हल्ला केला. ट्रॅकच्या मालकाचे वडील ल्युकाचे वडीलही यावेळी उपस्थित होते. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. माजी एफ 1 वर्ल्ड चॅम्पियन जेन्सन बटन यासारख्या बर्याच अनुभवी ड्रायव्हर्सनी ल्युकवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली.
वाचा-दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुबाडलं, VIDEO काढत बसले लोकं पण...
Karting driver Luca Corberi got mad at a race and then this happened. Should be a ban for life. pic.twitter.com/ofVoSif6fJ
— F1 Feeder Series (@F1FeederSeries1) October 4, 2020
वाचा-नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO
माजी एफ 1 वर्ल्ड चॅम्पियन जेनसन बटन म्हणाले की, एफआयए कार्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या गैरवर्तनामुळे ल्युकने आपली रेसिंग कारकीर्द खराब केली. त्याचे वडील सर्किटचे मालक आहेत आणि त्याने दुसऱ्या रेसरवर कसा हल्ला केला हे पाहिले जाऊ शकते. या दोघांवर आजीवन बंदी घालणे गरजेचे आहे.
Karter Luca Corberi continues to vent his anger after the kart race. Somebody arrest this guy. (via @EstagiariodaF1) pic.twitter.com/R9Kuk2VI4G
— F1 Feeder Series (@F1FeederSeries1) October 4, 2020
वाचा-सोशल मीडिया वापरणारी बायको नको! बंगाली वकिलानं ठेवली लग्नासाठी अजब अट
माजी प्रस्तुतकर्ता विल बक्सटनने सीआरके-एफआयए कार्टिंग चँपियनशिपचे प्रमुख असलेले फेरारी आणि विल्यमचा ड्रायव्हर फेलिप मसा यांना कॉल केले. त्यांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मसाने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral