जाहिरात
मराठी बातम्या / Viral / होंडा सिटीवर उलटला तांदळानं भरलेला कंटेनर, चालकाचा मृतदेहही मिळेना; पाहा भीषण अपघाताचा VIDEO

होंडा सिटीवर उलटला तांदळानं भरलेला कंटेनर, चालकाचा मृतदेहही मिळेना; पाहा भीषण अपघाताचा VIDEO

होंडा सिटीवर उलटला तांदळानं भरलेला कंटेनर, चालकाचा मृतदेहही मिळेना; पाहा भीषण अपघाताचा VIDEO

ट्रॉलीवर भरलेला एक कंटेनर होंडा सिटी कारवर पडला. या भीषण अपघातात होंडा सिटी दबून गेली. गाडीत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : मृत्यू कसा आणि कुठे येईल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये घडला. येथील रेड लाइट परिसरात भीषण अपघात घडला. तांदळानं भरलेली एक ट्रॉली रस्त्यानं जात होती. त्याचवेळी समोरून एक होंडा सिटी अचानत ट्रॉलीसमोर आली. ट्रॉली चालकाने कार वाचवण्यासाठी गाडी बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रॉलीवर भरलेला एक कंटेनर होंडा सिटी कारवर पडला. या भीषण अपघातात होंडा सिटीचा चुराडा झाला. गाडीत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सामन्य कार आणि रस्ता यांच्यातील अंतर 4 ते 5 फूट असते, मात्र कंटेनर पडल्यानंतर होंडा सिटी आणि रस्त्यामध्ये केवळ 1 फूटाचे अंतर होते. कार पाहिल्यानंतर त्यात बसलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो. वाचा- VIDEO रेसिंग ट्रॅकवर राडा, रेस हरला म्हणून प्रतिस्पर्ध्यावर फेकून मारला बम्पर

वाचा- लेन बदलताना रस्त्यातच लागली गाडीला आग; खिडकी दरवाजे झाले जाम अखेर, पाहा VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित मल्होत्रा ​​आणि रंजन कालरा ही रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. दोघेही इव्हेंट कंपनी चालवत होते, कामाच्या संदर्भात कोलकाताला जाण्यासाठी विमानतळाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वाचा- सिंग्नल तोडून हवेत उडाली गाडी, तीन वेळा आपटून रस्त्यावर आदळली; पाहा VIDEO रस्ते अपघाताशी संबंधित महत्त्वपूर्ण तरतुदी नव्या तरतुदींनुसार दिल्लीतील खासगी रुग्णालये यापुढे रस्त्याच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दुसरीकडे पाठवू शकत नाहीत. त्यांना उपचार करावे लागतील. याव्यतिरिक्त, खासगी रुग्णालयांना रुग्णांवर कॅशलेस उपचार करावे लागतील. ही योजना केवळ आणि केवळ रस्ते अपघातातील पीडितांसाठी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना सुरू केली. ही योजना सुरू केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की त्यांचे सरकार प्रत्येक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात