कॅलिफोर्निया, 05 ऑक्टोबर : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन पाब्लो एक भीषण अपघात झाला. वाहतुक कोंडी झाली असतानाचा अचानक रस्त्यात उभ्या असलेल्या एका गाडीनं पेट घेतला. मुख्य म्हणजे वाहन चालक गाडीतच होता. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील इतर लोकं गाडीची काच तोडून चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
शुक्रवारी घडलेल्या या अपघाताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलिंगच्या मते, हा अपघात सुमारे संध्याकाळच्या सुमारास घडला. वाहतुक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा किसा सिडान गाडी जळून खाक झाली होती. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी क्रॉसिंगजवळ असलेल्या कॉंक्रीटच्या भिंतीला आदळली. त्यानंतर अचानक गाडीनं पेट घेतला.
वाचा-सामान खरेदी करताना अचानक सुपरमार्केटमधील शेल्फ कोसळले आणि...पाहा थरारक VIDEO
i80 San Pablo exit of San Pablo Lytton Casino i tried calling 911 and it has been busy pic.twitter.com/7Rojf0d9d8
— SuE Ricafort (@myLIFE_quoted) October 3, 2020
वाचा-...अन् अंतराळात झाला जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO
दरम्यान, गाडीत असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला गाडीची काच फो़डून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीत असे समजले आहे की गाडी लेन बदलण्याच्या प्रयत्नाच भितींवर आदळली आणि अचानक गाडीनं पेट घेतला. रस्त्यावरील लोकांनी प्रसंगावधान दाखवत काच फोडून एकाला बाहेर काढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral