निखिल स्वामी, प्रतिनिधी बिकानेर, 9 जून : असं म्हणतात की, प्रत्येक व्यक्ती किमान एक कौशल्य घेऊन जन्माला येते. ते कौशल्य अचूक ओळखता आलं की जीवनात त्याचा योग्य वापर करता येतो. अशी अनेक कलाकार मंडळी आपण आजूबाजूला पाहत असतो. कोण लिहिण्यात पारंगत असतं, कोण क्रीडा क्षेत्रात चपळ असतं. कोण नृत्य, कोण नाट्य, तर कोण विविध वाद्य वाजवण्यात तरबेज असतं. बासरीची धून तर काहीजण इतकी सुंदर वाजवतात की जणू श्रीकृष्णाचा आभास होतो. परंतु तुम्ही आजपर्यंत केवळ तोंडाने बासरी वाजवणारे कलाकार पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुमची एका अशा कलाकाराशी ओळख करून देणार आहोत, जे तोंडाने नाही, तर चक्क नाकाने बासरी वाजवतात. तीही अगदी मधुर ताला-सुरात. पेशाने शिक्षक असलेले राजस्थानचे वसंत कुमार ओझा ही अप्रतिम कला सादर करतात. वसंत कुमार मागील 32 वर्षांपासून बासरी वाजतात. सेमी क्लासिकल, बॉलिवूड, राजस्थानी गीतांवर ते बासरी वाजवू शकतात. याशिवाय इतर अनेक प्रकारचे वाद्य वाजवणं त्यांना अवगत आहे. बासरी वाजवण्यात विश्वविक्रम करावा, असं त्यांचं स्वप्न आहे. https://youtu.be/AXj0vpEMQFE 12 वर्षांपूर्वी बिकानेरमध्ये एका आंतरराष्ट्रीय ऊंट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात वसंत कुमार सहभागी झाले होते. परफॉर्मन्सपूर्वी मित्रांसह गप्पागोष्टी करत असताना मस्करी मस्करीत त्यांनी नाकाने बासरी वाजवली. ते पाहून त्यांचे मित्र अगदी आश्चर्यचकित झाले. ‘ही एक अद्भुत कला आहे’, असं त्यांनी वसंत कुमार यांना सांगितलं. शिवाय स्टेजवर जाऊन तोंडाने नाही तर नाकानेच बासरी वाजव, असा आग्रह त्यांना केला. वसंत कुमार यांनी सुरुवातीला यासाठी नकार दिला, परंतु मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी स्टेजवर जाऊन नाकाने बासरी वाजवण्याचं धाडस केलं. सुदैवाने त्यावेळी त्यांच्या बासरीतून अतिशय मधुर सूर निघाले आणि त्यांच्या मित्रांप्रमाणेच महोत्सवातील श्रोतेही अचंबित झाले. या महोत्सवात देश-विदेशातील लोक सामील झाले होते. त्या सर्वांनी वसंत कुमार यांच्या परफॉर्मन्सनंतर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर वसंत कुमार यांनी आता या कलेवर प्रभुत्व मिळवायचं, असं ठरवलं. Mumbai News : 100 पेक्षा जास्त श्वानंसह एकाच घरात राहते 22 वर्षांची तरूणी, कसा करते सांभाळ? पाहा Video 32 वर्षांपासून बासरी वाजवत असतानाही आजही ते किमान 2 तास तरी बासरीची तालीम करतात. बासरी वाजवताना आपला श्वास कमी पडू नये यासाठी दररोज न चुकता प्राणायामही करतात. शिवाय बासरीची मोफत शिकवणीही घेतात. सध्या त्यांच्याकडून 15 मुलं शिकत आहेत. तर, त्यांचे अनेक विद्यार्थी आज देशाच्या विविध भागांमध्ये बासरी वाजवण्याची कला सादर करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.