मराठी बातम्या /बातम्या /Viral /नदी पार करताना घसरला पाय, क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात मुलं गायब; थरारक LIVE VIDEO

नदी पार करताना घसरला पाय, क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात मुलं गायब; थरारक LIVE VIDEO

नदी पार करत असताना पाय घसरल्यामुळे काही मुलं नदीत पडली, त्यांना स्थानिक तरुणांनी वाचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

नदी पार करत असताना पाय घसरल्यामुळे काही मुलं नदीत पडली, त्यांना स्थानिक तरुणांनी वाचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

नदी पार करत असताना पाय घसरल्यामुळे काही मुलं नदीत पडली, त्यांना स्थानिक तरुणांनी वाचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

वलसाड, 16 ऑगस्ट: गुजरातमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या विस्थापणासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. वलसाडमध्येही पावसाचा जोर वाढल्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एक भयंकर घटना वलसाडमध्ये गुरुवारी घडली. नदी पार करत असताना पाय घसरल्यामुळे काही मुलं नदीत पडली, त्यांना स्थानिक तरुणांनी वाचवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. या घटनेत चार जणांना वाचविण्यात आले. तर, बेपत्ता झालेल्याचा शोध अद्याप सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काप्राडा तालुक्यातील चिंचपाडा गावात नदी ओलांडून जात असताना 5 मुलं नदीत पडली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मुलं क्षणार्धात वाहून गेली. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.

वाचा-बुडत असलेल्या मित्रासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, मात्र दोघांनीही गमावला जीव

या मुलांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना काही तरुण दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ही मुलं पाण्याबाहेर येण्यासाठी हालचाल करताना दिसत आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना बाहेर येणे शक्य होत नव्हते.

वाचा-अचानक पाण्याचा वाढला वेग अन् एकाला वाचवताना तिघे गेले वाहून, पाहा LIVE VIDEO

" isDesktop="true" id="472674" >

वाचा-क्या बात है! संगीत नसतानाही पावसात केला जबरदस्त बॅले डान्स, VIDEO VIRAL

पाण्यात अडकलेल्या पाचपैकी एक जण अजूनही बेपत्ता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी घडलेल्या या घटनेच्या थेट व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये असे सूचित केले आहे की पावसाळ्यात घराबाहेर पडल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

First published:
top videos