अबूजा, 14 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेक जुगाड झालेले, प्राण्यांचे मजेशीर असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोरोनाच्या काळात सध्या एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. 11 वर्षांच्या मुलानं भर पावसात बॅले डान्स केला आहे. हा व्हिडीओ जगभरात एका रात्रीत व्हायरल झाला. 11 वर्षांच्या मुलाचा भन्नाट बॅले डान्स पाहून न्यूयॉर्कमधील डान्स स्कूलने त्याला स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) दिली आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये 11 वर्षांचा नायजेरियन मुलगा खूप सुंदर बॅले डान्स करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा 11 वर्षांचा असून त्याचे नाव अँथनी मेमसोमा मैडू आहे. बाहेर पाऊस पडत आहे आणि बॅले डान्ससाठी लागणारा पोषाख, शूज काहीच नसतानाही तो भरपावसात अनवाणी पायांनी बॅले डान्स करत आहे. त्याच्या हाता-पायाच्या हालचाली अक्षरश: थक्क करणाऱ्या आहेत.
हे वाचा-पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली चहलची होणारी बायको; धनश्रीचा VIDEO VIRAL
हे वाचा-चोर पावलानं दुकानात घुसला 'सीगल' पक्षी, चिप्सचं पाकिट घेऊन झाला भुर्रर्र, VIDEO
या 11 वर्षांच्या नायजेरियन मुलाचा डान्स पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. या मुलाचा व्हिडीओ जगभरात खूप व्हायरल झाल्यानंतर त्याचं कौशल्य आणि डान्स पाहून न्यूयॉर्क डान्स स्कूलनं त्याला कौतुकाची थाप म्हणून शिष्यवृत्ती दिली आहे.
या मुलाच्या बॅले डान्सचा व्हिडीओ लीप अॅकॅडमीनं जून महिन्यात आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. कोणत्याही संगीत नसतानाही त्यानं केलेला जबरदस्त डान्स पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर ह्याा व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे.