जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अचानक पाण्याचा वाढला वेग अन् एकाला वाचवताना तिघे गेले वाहून, पाहा LIVE VIDEO

अचानक पाण्याचा वाढला वेग अन् एकाला वाचवताना तिघे गेले वाहून, पाहा LIVE VIDEO

अचानक पाण्याचा वाढला वेग अन् एकाला वाचवताना तिघे गेले वाहून, पाहा LIVE VIDEO

नको धाडस जीवावर बेतलं, पाण्याचा प्रवाह वाढत असतानाही पाण्यात गेले आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

राजकोट, 15 ऑगस्ट : गुजरातमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नदी नाल्यांना अक्षरश: पूर आला असून अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. राजकोट इथल्या हडमतिया परिसरातील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. नदी ओलांडून पलिकडे जात असताना अचानक पाणी वाढल्यानं तीन जण अडकले. त्यांना नदी ओलांडू नका असं तिथल्या काही जाणकारांनी सांगितलं असतानाही प्रवाह जास्त नाही म्हणून तिघंही जण धाडस करून नदीत उतरले. नदीत अर्ध्यापर्यंत आल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढायला सुरुवात झाली. तिघांनी एकमेकांचे हात धरून वाट काढण्यास सुरुवात केली मात्र त्यातल्या एकाचा हात सुटला आणि धाडस तिघांना महागात पडलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जाहिरात

हे वाचा- स्वातंत्र्यदिनाआधी झालेल्या श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याचा थरारक VIDEO समोर या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता अर्ध्याहून अधिक नदी पार केल्यानंतर एका तरुणाचा हात सुटतो आणि पाणी त्याला आपल्यासोबत घेऊन जातं. हा तरुण वाहून जात असल्याचं पाहून दोन तरुण त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात मात्र प्रवाह एवढा मोठा होता की त्यात तिघेही तरुण वाहून गेले आहेत. तिथे उपस्थित असलेल्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस आणि एनडीआरएफ टीमनं घटनास्थळी दाखल होत तपास केला. तिघांपैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आलं असून अद्याप दोन तरुणाचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat
  • First Published :
जाहिरात
जाहिरात