मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - झोप येईना म्हणून इन्स्टाग्राम पाहिलं; मध्यरात्री लाइव्ह दिसला त्याच्याशीच केलं लग्न

VIDEO - झोप येईना म्हणून इन्स्टाग्राम पाहिलं; मध्यरात्री लाइव्ह दिसला त्याच्याशीच केलं लग्न

सोशल मीडियावर भेटून लग्न केलेल्या या जोडप्याची अनोखी लव्ह स्टोरी.

सोशल मीडियावर भेटून लग्न केलेल्या या जोडप्याची अनोखी लव्ह स्टोरी.

सोशल मीडियावर भेटून लग्न केलेल्या या जोडप्याची अनोखी लव्ह स्टोरी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 04 फेब्रुवारी : सोशल मीडियावर ओळख होऊन मैत्री होणं, त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि लग्नही करणं... अशी प्रकरणं तशी काही नवी नाहीत. पण सोशल मीडियावर पाहिलं आणि लगेच लग्न केलं असं होत नाही. पण असंच लग्न करणारं एक कपल सध्या चर्चेत आलं आहे. रात्री झोप लागेना म्हणून एका तरुणीने आपलं इन्स्टाग्राम ऑन केलं. त्यावर रात्री 3 वाजता एक तरुण तिला लाइव्ह दिसला, त्याच्याशीच तिने लग्न केलं. व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर ही लव्ह स्टोरी तुमच्यासाठी.

मिट्ठू आणि नितेश या कपलने Struggle Life Channel  युट्यूब अकाऊंटवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. मिट्ठू आणि नितेशची ओळख तशी शाळेपासून  मिट्ठू शाळेत जायची तिथं नितेश यायचा. तेव्हा ते दोघं एकमेकांशी बोलायचे पण त्यांच्यात एकमेकांप्रती प्रेमाची भावना नव्हती. शाळा संपली आणि त्यांचं भेटणंही बंद झाला. जवळपास चार वर्षे ते दोघं एकमेकांना भेटले नाही. चार वर्षांनंतर इन्स्टाग्रामवर त्यांची भेट झाली.

हे वाचा - Love story : ड्रायव्हरने गिअर टाकताच तरुणीच्या काळजात धडधडलं; लग्न करून त्याला घरजावईच बनवलं

मिट्ठू म्हणाली, रात्री तिला झोप येत नव्हती. म्हणून तिने इन्स्टाग्राम ऑन केलं. तेव्हा नितेश इन्स्टाग्रामवर लाइव्ह होता. तो आपल्या मित्रांसोबच एन्जॉय करत होता.  नितेशला लाइव्ह पाहणारी फक्त मिट्ठूच होती. त्याने तिला ओळखलं आणि लगेच मेसेज केला. काही वेळाने मिट्ठूनेही तिच्या मेसेजला रिप्लाय दिला आणि त्यांच्यात बोलणं सुरू झालं.

मिट्ठूने इतक्या रात्री काय करतो आहे, असं विचारलं. नितेशने आपण घरी जात आहोत असं सांगितलं. त्यानंतर तो घरी पोहोचेपर्यंत दोघं बोलत होते. रात्रीचे तीन वाजले होते. तोपर्यंत त्यांच्यात बोलणं सुरूच होतं. त्याचवेळी नितेशने तिला प्रपोज केलं. दोन दिवसांनंतर मिट्ठूने त्याला होकार दिला.

हे वाचा - VIDEO - लिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; 20 वर्षीय तरुणीने 60 वर्षांच्या कॉस्मेटिक विक्रेत्यासोबतच थाटला संसार

पण आपण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून राहायचं नाही तर लग्न करायचा असा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितलं. त्यांचं कुटुंबही लग्नासाठी तयार झालं. पण तीन वर्षांनी त्यांचं लग्न झालं.

" isDesktop="true" id="825614" >

आज मिट्ठू आणि नितेश आनंदाने आपला संसार करत आहेत. त्यांचं युट्यूब चॅनेलही आहे. जिथं ते आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करतात.

First published:

Tags: Love story, Relationship, Valentine Day, Viral, Viral videos