मुंबई 26 जानेवारी : हल्ली चोरी आणि दरोड्याच्या अनेक घटना वाढत चालल्या आहेत. अशात आपल्या घराची आणि वस्तुंच्या सुरक्षेची लोकांना काळजी असते. चोरटे देखील अशा घरांच्या शोधात असतात जिथे सुरक्षा कमी असेल आणि सहज गोष्टी चोरता येऊ शकतात. हे टाळण्यासाठी आता बहुतेक लोक त्यांच्या घरात क्लोज सर्किट कॅमेरे (सीसीटीव्ही) बसवतात.
पण आता सीसीटीव्ही लावणे प्रत्येकासाठी शक्य नाही. काहींचं तेवढं बजेट नसतं तर काही लोक अन्य कारणामुळे ते लावू शकत नाही.
हे ही पाहा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय
तसे पाहाता सीसीटीव्ही बसवण्याचा खर्च 5000 ते 20,000 रुपयांपर्यंत येतो. पण तुम्हाला एवढा जास्त खर्च न करता सीसीटीव्ही वापरायचा असेल तर काळजी करु नका, आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी पैशात सीसीटीव्ही तुमच्या घरी किंवा दुकानात लावू शकता.
यासाठी तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, तसेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही तुमच्या घरात कॅमेरा बसवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये अल्फ्रेड कॅमेरा अॅप डाउनलोड करा आणि तुमच्या नवीन स्मार्टफोनमध्येही हे अॅप डाउनलोड करा. तुमच्या स्मार्टफोनला सीसीटीव्ही कॅमेरा बनवण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे.
एकदा तुम्ही तुमच्या नवीन आणि जुन्या स्मार्टफोनवर हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर, तुमच्याकडे असा पर्याय आहे की तुम्ही दोन स्मार्टफोनपैकी एक कॅमेरा आणि दुसरा स्मार्टफोन मॉनिटर म्हणून वापरु शकता.
हा वापरायचा कसा?
एकदा तुम्ही दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अॅप डाऊनलोड केलं, त्यानंतर तुम्हाला ठरवायचे आहे की कोणता स्मार्टफोन कोणती भूमिका बजावणार आहे. हे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्या ठिकाणी कॅमेरा बसवावा लागेल जिथून तुम्ही तुमच्या घरावर सहज नजर ठेवू शकता.
या प्रक्रियेनंतर, तुम्हाला स्मार्टफोनच्या चार्जिंगची सोय करावी लागेल, जेणेकरून स्मार्टफोन डिस्चार्ज होणार नाही, अन्यथा तुम्ही तुमच्या घराचे निरीक्षण करू शकत नाही.
यानंतर तुम्हाला दोन्ही स्मार्टफोन हायस्पीड इंटरनेट कनेक्शनने जोडावे लागतील. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची कॅमेरा असलेली जागा झाकून ठेवावी, जेणेकरून धूळ, सूर्यप्रकाश आणि पावसाचा त्यावर परिणाम होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.