नवी दिल्ली 07 डिसेंबर : लग्न (Marriage) हे एक असं नातं आहे ज्यात फक्त नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) दोघंच एकत्र येत नाहीत तर त्यांची दोन कुटुंबही एकमेकांसोबत जोडली जातात. त्यामुळे आपलं लग्न एकदम वेगळं आणि हटके असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. जेणेकरून हे लग्न सर्वांच्या लक्षात राहील. मात्र, अनेकदा लग्नातच अशा काही घटना घडतात ज्यामुळे त्याची चर्चा अगदी दूर-दूरपर्यंत होते. सध्या असंच एक लग्न चांगलंच चर्चेत आहे आणि या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे.
हेही वाचा - डोळ्याच्या पापण्या मिटण्याआधी तरुणीने स्टेजवर बदलले कपडे; VIDEO पाहून व्हाल अवाक
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये लग्नाचं स्टेज सजलेलं होतं आणि स्टेजवर नवरी-नवरदेव उभा होते. दोघंही एकमेकांना वरमाळा घालायच्या तयारीत होते. मात्र, इतक्यात मध्येच एक तरुण स्टेजवर आला. हा तरुण नवरीच्या भांगामध्ये कुंकू भरू लागला (Unknown Man Applies Vermilion to Bride). हे पाहून नवरीसोबतच स्टेजवर उपस्थित सगळेच हैराण झाले. अचानक हे काय होत आहे, हेच कोणाला समजत नव्हतं. मात्र, जेव्हा प्रकरण लक्षात आलं तेव्हा सगळे या व्यक्तीला स्टेजवरुन खाली ढकलू लागले.
In UP's Gorakhpur, a spurned youth gatecrashed an ongoing wedding and applied vermilion to the to-be bride. Families and relatives tried to overpower him resulting in a major ruckus at the venue.@SaumyaShandily3 @anantmsr @vandanaMishraP2 pic.twitter.com/nZPKHl7VVi
— Vivek Pandey | विवेक पांडेय (@VivekPandeygkp) December 7, 2021
मिळालेल्या माहितीनुसार हा हैराण करणारा व्हिडिओ गोरखपूरच्या हरपूर बुदहट ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातला आहे. घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरचं असं म्हणणं आहे की ही घटना पूर्णपणे फिल्मी आहे. तर दुसऱ्या एकाने मजेशीर कमेंट करत लिहिलं, 'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो'. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा - NETFLIX वरून दोन बहिणींमध्ये कडाक्याची भांडणं, कारण ऐकून कळेना हसावं की रडावं
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा जबरदस्ती नवरीच्या भांगात कुंकू भरणारा युवक आपल्या घरी गेला. तर नवरदेवाला भरपूर समजावून हे लग्न पार पाडण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीला नवरदेवासोबत सासरी पाठवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Wedding video