मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डोळ्याच्या पापण्या मिटण्याआधी तरुणीने स्टेजवरच बदलले कपडे; VIDEO पाहून व्हाल अवाक

डोळ्याच्या पापण्या मिटण्याआधी तरुणीने स्टेजवरच बदलले कपडे; VIDEO पाहून व्हाल अवाक

Magic Video Viral: तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये महिला स्टेजवर फिरत इतके कपडे बदलते, जे बदलण्यासाठी आपल्याला निदान अर्धा तास लागेल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 07 डिसेंबर : लहान मुलं असो किंवा मोठी माणसं जादू पाहायला प्रत्येकालाच आवडतं. स्मार्टफोन्सच्या आधी जेव्हा व्हिडिओ कंटेंट जास्त प्रमाणात उपलब्ध नसायचा तेव्हा लोक आपल्या शहरात असलेले जादूचे शो पाहण्यासाठी जात असत. मात्र हळूहळू लोकांनी यूट्यूब आणि फेसबुकवरच जादू पाहायला सुरुवात केली. मात्र जादू ही अशी गोष्ट आहे जी ऑनलाईन पाहायलाही तितकीच मजेशीर असते. सध्या फेसबुकवर असाच एक जादूचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Magic Video of Woman) झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला जादूने आपले कपडे स्टेजवरच सर्वांसमोर बदलताना दिसते (Woman Change Clothes on Stage).

फेसबुक पेज पॅरोडाईजवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये (Magic Video) महिला जादूगराची ही कमाल पाहून सगळेच थक्क झाले. तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये महिला स्टेजवर फिरत इतके कपडे बदलते, जे बदलण्यासाठी आपल्याला निदान अर्धा तास लागेल. व्हिडिओच्या सुरुवातील महिला एका प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसते. मात्र पुढे तिची कला पाहून सगळेच थक्क होतात.

महिला वेगवेगळ्या ड्रेसजवळ जाते आणि हा ड्रेस आपल्याकडे ओढताच तो तिच्या अंगात दिसतो आणि जुना ड्रेस गायब होतो. यानंतर ती पुन्हा पुढे चालते आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसजवळ पोहोचते. यानंतर आपोआपच तिच्या अंगातील हिरव्या ड्रेसचा रंग बदलून पिवळा होतो. यानंतर ती एवढ्यावरच थांबत नाही तर हळूहळू ती बाकी ड्रेसही बदलत राहते.

या अद्भुत व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 13 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की महिला ज्या पद्धतीने आपल्या कलेचं प्रदर्शन करत आहे, ते पाहून असं वाटतं जणू तिने हजारो वर्ष या ट्रिकचा सराव केला आहे.

First published:

Tags: Video Viral On Social Media, Viral news