Home /News /viral /

OMG! NETFLIX वरून दोन बहिणींमध्ये कडाक्याची भांडणं, कारण ऐकून कळेना हसावं की रडावं

OMG! NETFLIX वरून दोन बहिणींमध्ये कडाक्याची भांडणं, कारण ऐकून कळेना हसावं की रडावं

हल्ली कोण, कधी आणि कशावरून भांडेल, याचा काही नेम नाही. दोन बहिणींमधलं एक भांडणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 6 डिसेंबर: नेटफ्लिक्सवरून दोन (Fight between sisters) बहिणींमध्ये अशी काही कडाक्याची भांडणं झाली की त्यांनी एकमेकींचा चेहराही पाहणं सोडून दिलं. लहान वयात मुलं कुठल्याही (Fight over Netflix) कारणावरून एकमेकांशी भांडत असतात, मात्र जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसे हे वाद कमी होतात आणि फालतू कारणावरून होणारी (Fight over ordinary reasons) भांडणंही कमी होत जातात. मात्र काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र हे घडत नाही. वय वाढलं तरी त्या व्यक्ती एकमेकांशी भांडत राहतात आणि वाटेल त्या कारणावरून डोक्यात राख घालून घेतात. नेटफ्लिक्सवरून दोन बहिणीमध्ये झालेली भांडणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटफ्किक्सवरून वादाला तोंड दोन बहिणींमध्ये नेटफ्लिक्सवरून वाद उभा राहण्याला कारण ठरलं तो पहिल्या बहिणीचा बॉयफ्रेंड. आपल्या बॉयफ्रेंडला नेटफ्किक्स पाहण्याची इच्छा असून त्याला लॉग-इन देण्याची विनंती तरुणीनं तिच्या बहिणीकडं दिली. ती मान्य करत बहिणीच्या बॉयफ्रेंडला तरुणीनं तिचा आयडी आणि पासवर्ड दिला. आपण काय पाहतो, ते कंटेंट प्रायव्हेट राहावं, यासाठी तरुणानं स्वतःचं वेगळं प्रोफाईल तयार केलं आणि तो सुखाने त्याचा कंटेंट पाहत राहिला. जेवताना झालं भांडण एकदा दोन्ही बहिणी एकत्र जेवत असताना नेटफ्लिक्सचा विषय निघाला. आपली बहीण नेटफ्लिक्सवर काय पाहते, याचे तपशील तिच्या बहिणीने सांगितले. आपण काय पाहतो, हे तुला कसं समजलं, असा विचार बहिणीने केला. त्यावर आपल्या बॉयफ्रेंडनं आपल्याला ही माहिती दिल्याचं ती म्हणाली. या मुद्द्यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण झालं. दोघींनाही एकमेकींचे मुद्दे पटत नव्हते आणि दोघींची तुंबळ वादावादी आणि हाणामारी झाली. हे वाचा- 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स बहिणीने बदलला पासवर्ड या घटनेनंतर बहिणीनं आपल्या नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड बदलून टाकला आणि बॉयफ्रेंडला ते अकाउंट वापरणं अशक्य झालं. दोघींच्या भांडणात बॉयफ्रेंडला मिळणारा फ्री कंटेंट मात्र मिळेनासा झाला. त्यानंतर तरुणीने रेडिट.कॉम वर आपली कैफियत मांडली. तिला युजर्सनी पाठिंबा दिला असून आपली प्रायव्हसी जपण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Delhi, Girlfriend, Netflix

    पुढील बातम्या