Home /News /viral /

जगात केवळ दोनच ठिकाणी फुलतं हे दुर्मिळ फूल; किंमत ऐकून व्हाल थक्क, रंजक आहे याची कथा

जगात केवळ दोनच ठिकाणी फुलतं हे दुर्मिळ फूल; किंमत ऐकून व्हाल थक्क, रंजक आहे याची कथा

हे फूल जगातील सर्वात दुर्मिळ फूल (World’s Rarest Flower) आहे. या फुलाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे जगात केवळ दोनच ठिकाणं फुलतं.

    नवी दिल्ली 19 सप्टेंबर : जगात अनेक अशा विचित्र (Weird) किंवा अजब बाबी आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहितीच नाही किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना यामागचं कारणच माहिती नाही. माणूस आणि प्राणी यांच्याशिवाय झाडं-झुडपं यांच्याही अनेक अशा अनोख्या आणि विचित्र गोष्टी असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या फुलाबद्दल (Unique Flower) सांगणार आहोत. हे फूल जगातील सर्वात दुर्मिळ फूल (World’s Rarest Flower) आहे. या फुलाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे जगात केवळ दोनच ठिकाणं फुलतं. ‘मिडिलमिस्ट रेड’ (Middlemist’s Red Camelia) एक प्रकारचं स्प्रिंग रोज म्हणजेच गुलाबाचं फूल आहे. हे फूल जगातील सर्वात दुर्मिळ फूल आहे आणि ते केवळ न्यूझिलंड आणि ब्रिटनमध्येच उमलतं. साल 1804 मध्ये जॉन मिडलमिस्ट (John Middlesmist) नावाच्या व्यक्तीनं हे फूल चीनमधून घेतलं होतं आणि हाच व्यक्ती हे फूल इंग्लंडला घेऊन आला होता, त्यामुळे या फुलाला मिडिलमिस्ट रेड नाव पडलं. हे फूल एकेकाळी अत्यंत दुर्मिळ आणि किमती होतं. हे फूल केवळ इंग्लंडच्या श्रीमंत लोकांच्या घरीच आढळतं, कारण ते अत्यंत महाग आहे. मिडिलमिस्टनं हे फूल इंग्लंडच्या कियू गार्डनमध्ये दान केलं होतं. मात्र, हे फूल तिथून गायब झालं. साल 1823 पर्यंत हे फूल केवळ इंग्लंडच्या चिस्विक हाउस आणि गार्डनमध्येच (Chiswick House & Gardens) पाहायला मिळू लागलं. इतकं गाढ झोपलं पिल्लू की हलवूनही उठेना; हत्तीणीने काय केलं पाहा VIDEO असं म्हटलं जातं, की हे फूल मुळचं चीनमधील आहे आणि सर्वात आधी हे फूल तिथेच आढळलं. मात्र, आतापर्यंत हे कोणलाच समजलं नाही, की हे फूल चीनमधून पूर्णपणे नष्ट कसं झालं आणि केवळ एक फूल न्यूझीलंडमध्ये पोहोचून इथे पसरण्यास सुरुवात कशी झाली. न्यूझीलंडमध्ये हे फूल वॅटांगीच्या (Waitangi) ट्रीटी हाउसमध्ये उमलतं (Treaty House). 1833 साली पहिल्यांदा हे फूल याठिकाणी उमललं होतं. याचाच अर्थ सध्या हे फूल केवळ इंग्लंडच्या चिस्विक हाऊस आणि न्यूझीलंडच्या ट्रीट्री हाऊसमध्येच उमलतं. लाल लाईट पेटताच हवेत उडाला तरुण; मॉडेलच्या डान्सनंतर सिग्नलवरील नवा VIDEO नुकतंच हे ब्रिटनमधून साउदी अरबला पाठवलं गेलं होतं. फूल विकणारे या गोष्टीची विशेष काळजी घेतात की हे फूल नेमकं कोणाला विकलं जात आहे. इंग्लंडच्या चिस्विक हाउसचे गार्डनर जेराल्डिन किंग यांचं म्हणणं आहे, की दोन दशकांआधी जेव्हा ड्यूक ऑफ डेवोनशायर या चिस्विक हाउसचे मालक होते तेव्हा ते हे डिलमिस्ट रेड फूल अत्यंत महाग विकत असे. त्यावेळीच या फुलाची किंमत 3 लाखाहून अधिक होती. गार्डनरनं सांगितलं, की ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हे फूल साउदी अरबला पाठवलं गेलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Rose, Viral news

    पुढील बातम्या