मुंबई, 19 सप्टेंबर : आपल्या मुलांना उठवणं (Waking up) म्हणजे पालकांसाठी मोठं आव्हानच असतं. बरं ही समस्या फक्त माणसांमध्येच आहे (Sleep), असं नाही तर प्राण्यांमध्येही आहे. अशाच एका गाढ झोपलेल्या छोट्या हत्तीचा (Baby elephant video) आणि त्याला उठवणाऱ्या त्याच्या आईचा (Mother elephant video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हलवून हलवून पिल्लू उठलं नाही अखेर हत्तीणीने (Elephant video) काय केलं ते तुम्हीच पाहा (Mother elephant trying to wake up baby). जशी आई आपल्या मुलांना उठवण्यासाठी सर्व प्रयत्न करते. तसेच प्रयत्न ही हत्तीणसुद्धा करते. पण तिचं पिल्लू इतकं गाढ झोपलं आहे की ते उठतच नाही. शेवटी हत्तीणीने असं काही केलं की पिल्लू धाडकन उठलं. हत्ती आणि तिच्या पिल्लाचा हा क्युट व्हिडीओ तुम्हालासुद्धा नक्की आवडेल.
@buitengebieden_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता हत्तीच पिल्लू एका ठिकाणी झोपलं आहे. जे जसं झोपलं आहे, त्यावरून ते गाढ झोपी गेलं आहे हे स्पष्ट होतं. हे वाचा - VIDEO - ससाण्याशी भिडली बकरी; कोंबडीच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं त्याची आई त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. पण इतके प्रयत्न करूनही पिल्लू काही उठेना. मग काय हत्तीणसुद्धा वैतागली. शेवटी ती आपल्या केअरटेकरजवळ पोहोचली. त्यांची मदत तिने मागितली. हत्तीण केअरटेकना घेऊन आपल्या पिल्लाजवळ आली. एक केअरटेकर त्या पिल्लाजवळ गेला. त्यानेही पिल्लाला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. मग काय केयरटेकर त्याला एक फटका देतो, मग हत्ती धाडकन उठतं. क्षणभर ते घाबरतं, बावरतं आणि उठून आपल्या आईकडे पळत जातं. हे वाचा - बुडणाऱ्या पिल्लासाठी हत्तींची धडपड; पाण्यात उडी मारत वाचवला जीव पाहा VIDEO हत्तीणीचं आपल्या पिल्लांवर खूप प्रेम असतं. हत्तीण आणि तिच्या पिल्लाचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात पिल्लू पाण्यात खेळण्यात दंग होतं आणि त्याची आई त्याच्यावर लक्ष ठेवून होती.
See who is chilling in this hot summer under the watchful eyes of mother pic.twitter.com/5yBhQYj73m
— Susanta Nanda (@susantananda3) April 11, 2021
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये कार्यरत सुशांत नंदा यांनी या पिल्लाचा 51 सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचे पिल्लू पाण्याने भरलेल्या टबमध्ये डुबकी मारून बराच वेळ पाण्यात खेळतं आहे. व्हिडिओमध्ये हत्तीण टबभोवती फिरून पाण्यात खेळणाऱ्या पिल्लावर लक्ष देत असल्याचंही दिसतं आहे.