इंदूर, 18 सप्टेंबर : नुकतंच ट्रॅफिक सिग्नलवर (Traffic Signal) डान्स करणाऱ्या एका मॉडेलनं (Model dance at Traffic Signal) सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आता या मॉडेलनंतर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो रेड लाइट पेटताच हवेत उडताना दिसला आहे. चौकात असणाऱ्या झेब्रा क्रॉसिंगवर हा तरुण खतरनाक स्टंट करताना दिसला आहे (Boy stunt at Traffic Signal). चौकातील सिग्नल जेव्हा लाल (Turned red) झाला, तेव्हा सगळी वाहनं (Vehicles) थांबली. त्या क्षणी अचानक एक तरुण तिथे आला आणि हवेत झेपावत स्टंट करू लागला. झेब्रा कॉसिंगवर त्याने आपल्या पदलालित्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओत पाहू शकता झेब्रा क्राॉसिंगवर येऊन हा तरुण हवेत झेपावत फ्लिप मारतो.
young man stunt video viral after model Shreya Kalra dance at Indore's Rasosa crossroads pic.twitter.com/DlxoNbxMV1
— Vishwanath Saini 🇮🇳 (@SainiVishwanath) September 17, 2021
विश्वनाथ सैनी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओसुद्धा इंदोरमध्ये ज्या ठिकाणी मॉडेलनं डान्स केला त्याच रसोसा चौकातील असल्याचं सांगितलं जातं आहे. माहितीनुसार हे दोन्ही व्हिडीओ एकाच दिवसाचे असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - तोऱ्यात छातीला फटाक्यांची माळ गुंडाळून पेटवली आणि…; नको तो स्टंट पडला भारी याआधी मॉडेल श्रेया कालरा इथं डान्स करताना दिसली. त्यानंतर तिने यावर स्पष्टीतरणही दिलं होतं. आपण जनजागृतीसाठी हा डान्स केल्याचं श्रेयानं सांगितलं.
सर्वांनी मास्क वापरावा, हा संदेश देण्यासाठी आपण हा डान्स केला असून त्यावेळी आपल्याही चेहऱ्यावर मास्क होता, असं तिनं म्हटलं आहे. अशा सरप्राईजिंग पद्धतीनं दिलेला संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळ त्यांच्या लक्षात राहतो, असं तिनं म्हटलं आहे. शिवाय, आपण वाहतुकीचे कुठलेही नियम न मोडता, सिग्नल रेड झाल्यावरच हा डान्स केला आणि ग्रीन सिग्नल लागण्यापूर्वीच आपण तिथून हटलो, असंही तिनं सांगितलं. हे वाचा - नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा VIDEO संदेश देण्याचा उदेदश चांगला असला तरी वर्दळ असणाऱ्या चौकात सिग्नलवर डान्स करणं ही बाब धोकादायक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ट्रॅफिक सिग्नलवर कुठल्याही प्रकारे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे अशा ठिकाणी गर्दीच्या वेळी डान्स करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांनी दिली आहे.