मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यातील पिपरिया रांकई गावात पोपट आणि मैनेचा विवाहसोहळा पार पडला आहे. परिहार कुटुंबातील मैना रिंका आणि विश्वकर्मा कुटुंबातील पोपट मिंटू यांचं लग्न झालं आहे.
परिहार कुटुंबात मुलगी नाही. त्यामुळे या कुटुंबाने दोन मैना पाळल्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबाकडे पोपट होता. गावातील एका वृद्ध महिलेने दोन्ही कुटुंबातील पक्ष्यांच्या लग्नाची आयडिया दिली.
त्यानंतर परिहार कुटुंबातील दोन मैनांपैकी एक रिंका आणि मिंटूची दोन्ही कुटुंबाने पत्रिका बनवली. पंडितला ती दाखवली. दोघांचे गुण जुळल्यानंतर त्यांचं लग्न ठरवण्यात आलं.
अगदी पारंपरिक पद्धतीने हे लग्न झालं. लग्नातील सर्व विधी पार पडला.लग्नमंडप सजवण्यात आला. वाजतगाजत मिंटूची वरात निघाली. ढोलाच्या तालावर वरातीही नाचले.
पोपट कारमधून बसून वरात घेऊन मैनेच्या घरी आला आणि त्याच कारमध्ये बसून मैना पोपटच्या घरी म्हणजे आपल्या सासरी केली. सासरी तिचं अगदी सुनेप्रमाणे जंगी स्वागत झालं.दोघांनी सात फेरे घेतले.
या लग्नासाठी तसं कुणाला आमंत्र्ण देण्यात आलं नव्हंत पण जशी याची माहिती झाली तसे बरेच लोक या अनोख्या विवाहसोहळ्यात सहभागही झाले. संपूर्ण गावाने वधू-वराला आशीर्वाद दिल्याचं कुटुंबाने सांगितलं.