VIDEO : 8 वर्षांची चिमुरडी झाली 80 वर्षांची, ‘या’ भयंकर आजारामुळे झाला मृत्यू

VIDEO : 8 वर्षांची चिमुरडी झाली 80 वर्षांची, ‘या’ भयंकर आजारामुळे झाला मृत्यू

जगातील 180 मुलांना या भयंकर आजाराची लागण झाली आहे. तुमच्या मुलांनाही होऊ शकतो हा आजार.

  • Share this:

युक्रेन, 17 फेब्रुवारी : तुम्ही कधी 8 वर्षांची चिमुरडी 80 वर्षांची झालेली पाहिली आहे का? कोणतेही मेकअप किंवा कपडे घालून नाही तर एका भयंकर आजारामुळं खरच एक चिमुरडी 80 वर्षांची झाली आणि या आजारामुळे तिचा मृत्यूही झाला. युक्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे, आठ वर्षांच्या मुलीचे लहान वयातच निधन झाले.

अन्ना साकिडॉन (Anna Sakidon) असे या मुलीचे नाव आहे. या गोड मुलीचे खरे वय केवळ 8 वर्ष होते, परंतु तिला एका आजाराने ग्रासले ज्यामुळे ती वृद्ध झाली होती. या आजारामुळे मरण पावलेली अन्ना जगातील सगळ्यात तरुण चिमुरडी ठरली आहे.

वाचा-गोष्ट एका लग्नाची! 50 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशन नंतर केलं लग्न

या रोगाचे नाव प्रोजेरिया आहे. या दुर्मिळ अनुवंशिक आजार आहे. या आजारामुळं मुलांच्या शरीरातील सर्व अवयव हळूहळू वृद्ध होऊ लागतात. शेवटी सर्व अवयव काम करणे बंद होतात. अमिताभ बच्चन यांच्या ‘पा' या बॉलीवूड चित्रपटात हा आजार दाखविण्यात आला. त्यात अमिताभ यांनी प्रोजेरिया ग्रस्त मुलाची भूमिका केली होती.

वाचा-मोहन भागवतांच्या घटस्फोटाच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर, म्हणाली...

वाचा-आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

सध्या जगातील केवळ 160 लोक प्रोजेरियामुळे आजारी आहेत. अन्ना साकिडॉन या चिमुरडीचे याच भयंकर आजारामुळं वयाच्या 8व्या वर्षी निधन झाले आहे. परंतु प्रोजेरियामुळे ती जवळजवळ 80 वर्षांची होती. त्याचे वजन 7 किलो होते. शेवटी, त्याच्या सर्व अवयवांनी काम करणे बंद केले. अन्ना साकिडॉनची आई इव्हाना यांनी, मी माझी मुलगी गमावली आहे. मी तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होतो. पण मी तिला वाचवू शकलो नाही”, असे सांगितले

वाचा-दागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं

तर, अन्ना साकिडॉनवर उपचार करणारे डॉक्टर नादेहदा कॅटमॅन यांनी, अन्ना साकिडॉनबाबत जे झाले ते फार दुर्दैवी होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर व्होलिन रीजनल चिल्ड्रेन्स मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये उपचार सुरू होते. पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही, असे सांगितले.

First published: February 17, 2020, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या