दागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं

दागिन्याने केला घात, लोखंडवालामधील माय-लेकीच्या वादात आईने स्वत:ला संपवलं

दोघींमध्ये वाद झाल्यानंतर मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर मात्र...

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : मुंबईतील अंधेरी येथील उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात एकाच घरातील माय-लेकींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुर्देवाने आईचा मृत्यू झाला आहे. रविवारी एका 50 वर्षीय महिलेने ओशिवारा येथील लोखंडवाला कॉम्पलेक्सच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शशी सागर असं या महिलेचं नाव आहे. आई व मुलीमध्ये झालेल्या वादातून मुलीने फिनाईल प्य़ायल्यानंतर शशी यांनी सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

शशी आपला पती, मुलगी, जावई व नातवासह लोखंडवालाच्या चौथ्या मजल्यावर भाड्याने राहतात. शशीच्या मुलीला रविवारी फिरायला जायचे होते. तयार होताना ती आपला एक दागिना शोधत होती. मात्र तो तिला सापडत नव्हता. तिने आपल्या आईला दागिन्याविषयी विचारले. मात्र या संवादाचे रुपांतर वादात झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शशीचे पती आणि बहीण लिविंग रुममध्ये बसलेले होते. यादरम्यान शशीची मुलगी हिने संतापून फिनाइल प्यायल्याचे सांगितले जात आहे. घरातल्यांना हे लक्षात येताच ते मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी घाई करु लागले. त्यादरम्यान शशी यांनी सातव्या मजल्यावरुन उडी घेण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण जेव्हा त्यांची शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर आढऴून आला. यामध्ये त्यांचा जागीत मृत्यू झाला. शशी यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात  शोककळा पसरली आहे. तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.

अन्य बातम्या

VIDEO : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसाला बेदम मारहाण

डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

First published: February 17, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या