गोष्ट एका लग्नाची! 50 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशन नंतर केलं लग्न

गोष्ट एका लग्नाची! 50 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशन नंतर केलं लग्न

प्रेम आणि लग्न करण्यासाठी वयाचं कोणतच बंधन नसतं हेच खरं आहे. असाचं एक अनोखा विवाह सोहळा छत्तीसगडमध्ये पार पडलाय.

  • Share this:

कवर्धा ( छत्तीसगड ), 17 फेब्रुवारी : असं म्हणतात प्रेमाला आणि लग्नाला कोणतचं बंधन नसतं. जोडीदार निवडला की तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबत असतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आमुक याने आपल्याहून मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं. तमुक याने आपल्याहून लहान व्यक्तीशी लग्न केलं अशा अनेक घटना आपण ऐकतच असतो. पण सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती एका वेगळ्या लग्नाची. हे लग्न झालयं छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात.

कवर्धा जिल्ह्यातील खैरझिटी कला गावात शनिवारी एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा कोणा तरुण जोडप्याचा नाही तर 73 वर्षाचा नवरा आणि 67 वर्षाच्या वधूचा होता. हे दोघेही गेल्या 50 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. आणि या 50 वर्षांच्या नात्यानंतर अखेर त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. आणि संपुर्ण कुटुंब आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

इतर बातम्या - आता भक्तांसोबत शंकर भगवानही करणार रेल्वेने प्रवास, 'हा' आहे आरक्षित सीट नंबर

सुकाल निषाद असं नवविवाहित नवऱ्याचं आणि गौतरहीन बाई असं नवविवाहित वधूचं नाव आहे. त्यांनी आपल्या मुलांजवळ लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलांनी अगदी थाटामाटात त्यांच लग्न लावून दिलं आहे. त्यामुळे या जोडप्याची 50 वर्षापासून असलेली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली आहे. या दोघांचा लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कशी झाली होती भेट

सुकाल निषाद आणि गौतरहीन बाई यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सुकाल निषाद हे आपल्या एका नातेवाईकाला मुलगी बघण्यासाठी बेमेतरा जिल्ह्यातील बिरसिंगी गावात आले होते. ज्या मुलीसोबत त्या नातेवाईकाच लग्न होणार होतं तिची छोटी बहिण सुकाल निषाद यांना पसंत पडली. त्यानंतर त्यांच्या भेटी-गाठी व्हायला लागल्या. त्यानंतर सुकाल यांनी गौतरहीन यांच्याबरोबर आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सुकाल निषद हे मजुरी करायचे. त्यामुळे लग्नाचा खर्च करणं त्या दोघांनाही शक्य नव्हतं. त्यामुळे ते लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहू लागले. आणि विशेष म्हणजे कुणीही त्यांच्या नात्याला विरोध केला नाही.

इतर बातम्या - Filmfare Award : गल्ली बॉयने पटकावले सर्वाधिक पुरस्कार, अमृताने शेअर केला VIDEO

गावात रामायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. सुकाल आणि गौतरहीन यांना 2 मुलं, 1 बेटी आणि 13 नाती आहेत. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आई-वडिलांच्या लग्नसोहळ्याचा मुलांनीही आनंद व्यक्त केला. 50 वर्षानंतर आई-वडिलांची इच्छापूर्ती झाल्याने मुलांबरोबच सर्वजण आनंदी होते. संपूर्ण गावात आनंदाच वातावरण होतं.

First published: February 17, 2020, 10:51 AM IST

ताज्या बातम्या