आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

संतोष येळवंडे असं मुलाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पडलेल्या 47 वर्षीय वडीलांचं नाव असून 19 वर्षीय आरोपी विराज येळवंडे याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

देहू, 17 फेब्रुवारी : नवरा-बायकोच्या घरगुती किरकोळ वादातून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला संताप अनावर झाल्याने जन्मदात्या पित्याच्या डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना देहू गाव येथील माळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

संतोष येळवंडे असं मुलाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पडलेल्या 47 वर्षीय वडीलांचं नाव असून 19 वर्षीय आरोपी विराज येळवंडे याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. मयत संतोष येळवंडे याला दारूचे व्यसन होते. या व्यसनापायी तो नेहमीच घरात भंडणे करायचा. आपली पत्नी कविता हिला मारहाण करायचा. या सगळ्यामुळे विराज वैतागला होता.

काल मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असताना विराजने दोघांचे भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. पंरतू वडीलाकंडून आईला होत असलेली मारारहान पाहून विराजने रागाच्या भरात शेजारी पडलेल्या लाकडाच्या फळीने वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत संतोष येळवंडे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जखमी संतोष यांला आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केलं.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंवरील नाराजीनंतर शरद पवारांनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक

देहूरोड पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत आरोपी विराज याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, वडिलांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण घरावर शोकाकूळ वातावरण आहे. तर या सगळ्या प्रकारामुळे आरोपी विराजच्या आईला मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी पती आणि मुलाला गमावल्यामुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यावर आता पोलीस तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: February 17, 2020, 9:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या