धक्कादायक! धर्मगुरूंनी महिलेशी थाटला संसार, हनीमूनआधीच लागली वाट आणि...

धक्कादायक! धर्मगुरूंनी महिलेशी थाटला संसार, हनीमूनआधीच लागली वाट आणि...

धर्मगुरूंनी महिलेशी थाटला संसार, पण हनीमूनआधीच पितळ पडलं उघडं

  • Share this:

कंपला, 16 जानेवारी : लग्न म्हंटल की दोन लोकांचा सुखी संसार जो विश्वासावर अवलंबून असतो. मात्र कधी लग्नात बायको म्हणून घरी आणलेली दोन आठवड्यातच पुरुष निघाली, असा प्रकार ऐकला आहे? मात्र असा प्रकार चक्क धर्मगुरूंसोबत घडला. आफ्रिकेच्या युगांड येथील धर्मगुरूंना लग्नानंतर एक मोठ झटका बसला आहे. लग्नानंतर दोन आठवड्यांनी या धर्मगुरूंना त्यांची पत्नी एक स्त्रीनसून पुरुष असल्याचे कळले. मोहम्मद मुतुबा आणि त्याच्या वधूचे दोन आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध झाले नाहीत. त्याआधीच मोहम्मद यांना पत्नीचे घरे रुप कळले.

वाचा-दोन दिवसांत करा बँकेतली महत्त्वाची कामं, 11 तास बंद असणार 'ही' सेवा

युगांडाच्या डेली मॉनिटर या वृत्तसंस्थेनुसार, या दोघांच्या लग्नाला फक्त 2 आठवडे झाले आहेत. या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते आणि यामुळे धर्मगुरूला आपली पत्नी पुरुष असल्याचे कळले नाही. तथापि, 2 आठवड्यांनंतर धर्मगुरूच्या शेजाऱ्याने त्यांची पत्नी स्त्री नसून पुरुष असल्याचे सांगितले. धर्मगुरूच्या शेजाऱ्याने त्याच्या पत्नीला भिंतीवरून उडी मारून टीव्ही आणि कपड्यांसह त्यांचे सामान चोरताना पाहिले. यानंतर शेजाऱ्यांनी धर्मगुरूंची पत्नी स्त्री नसून पुरुष असल्याचे सिध्द केले.

वाचा-मुंबई-भुवनेश्वर एक्सप्रेसला अपघात, मालगाडीला दिली धडक, 20 प्रवाशी जखमी

धर्मगुरूच्या शेजाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणात एफआयआर दाखल केला. त्यानंतर थोड्याच वेळात धर्मगुरू आणि त्यांची पत्नी यांना पोलिसांनी पकडून नेले. धर्मगुरूच्या पत्नीने हिजाब आणि सँडल घातले होते. दरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तुरूंगात टाकण्यापूर्वी तिची तपासणी केली आणि ती स्तब्ध झाली. इमामच्या पत्नी चे रहस्य महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या तपासणीतून उघड झाले. यानंतर पोलिसांनी जेव्हा इमामला याबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

वाचा-महिला क्रिकेटरला मिळाला न्याय! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कोचविरोधात गुन्हा

दरम्यान, आरोपीने पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान सांगितले की त्याने पैशासाठी धर्मगुरूंशी लग्न केले होते. यानंतर धर्मगुरूने सांगितले की, त्याने आरोपीला कंपिसी मशिदीत भेट घेतली होती. या सगळ्या प्रकरणावर धर्मगुरूंनी, "मी लग्नासाठी एक सुंदर मुलगी शोधत होतो आणि जेव्हा मी हिजाब परिधान केलेल्या सुंदर मुलीला भेटलो तेव्हा मी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि तिने मला लग्नासाठी हो म्हणाली", असे सांगितले. तसेच धर्मगुरूंनी, "त्याने मला सांगितले की लग्न होईपर्यंत आपण शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. त्यामुळे याबाबत मला कळले नाही", असे धक्कादायक स्पष्टीकरण दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2020 09:51 AM IST

ताज्या बातम्या