मुंबई, 16 जानेवारी: तुमची बँकेतली अर्थिक व्यवहारांशी संबंधित काही महत्त्वाची कामं असतील तर ती येत्या 48 तासांत उरकून घ्या. त्याचं कारण म्हणजे 18 जानेवारीला बँकेची इंटरनेट सुविधा बंद राहणार असल्यानं आर्थिक कामांमध्ये अडथळा येणार आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFCने काही तांत्रिक कारणांसाठी 18 जानेवारी रोजी आपली इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 11 तास ही सुविधा बंद राहणार असल्यानं बँक आणि ATM वर ताण येण्याची शक्य़ता आहे. या कालावधीमध्य़े ग्राहकांना कोणत्याही प्रकारे इंटरनेटद्वारे आर्थिक देवाण-घेवाण करता येणार नाही. या कालावधीत इंटरनेट बँकिंग (Net Banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking), फोन बँकिंग (Phone Banking), आयव्हीआर, क्रेडिट कार्ड सारख्या सेवांचा लाभ घेता येणार नाही.
11 तासांसाठी बँकेकडून बंद राहणार सुविधा असा होईल परिणाम
HDFC बँकेनं आपल्य़ा ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. 18 जानेवारी रोजी रात्री 1 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्य़ंत 11 तासांसाठी इंटरनेट सुविधांसह इतर सेवा बंद राहणार आहेत. ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी बँकेकडून कायम अलर्ट देण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांनी या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू नये.
ही माहिती कुणालाही देऊ नका
बँकेनं ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्याशी संबंधीत असलेला पासवर्ड अथवा OTP नंबर कुठल्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका. यासोबतच तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या फेक कॉलला तुमची कोणतीही माहिती देऊ नका. आधार कार्ड, पॅन कार्डपासून क्रेडिट कार्डपर्यंत कोणताही नंबर, अथवा पासवर्ड त्यांना देऊ नये. बँक नेहमी पत्र अथवा ऑनलाईन सुविधा असल्यास मेल पाठवते. त्यामुळे अशा खोट्या फोनना बळी पडू नका.
Sharing your passwords and bank details is something that will never be a trend. Be safe, secure and smart, and protect yourself from phishing and cyber crimes. To know more click here: https://t.co/9JqWzjnYDb#SecureBanking #newpassword pic.twitter.com/tUriGqXhfl
— HDFC Bank (@HDFC_Bank) January 8, 2020
मागच्या महिन्यात आलेल्या तांत्रिक अडचणी
HDFC बँकेची ऑनलाइन सुविधा डिसेंबर महिन्यात 2 दिवस ठप्प झाली होती. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना 2 दिवस मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेक आर्थिक व्यवहार खोळंबले होते. तांत्रिक कारणांमुळे सेवा ठप्प असल्याचं HDFC बँकेनं ट्वीट करून त्यावेळी सांगितलं होतं. आताही 18 जानेवारीला तांत्रिक कारणांसाठी 11 तास सेवा बंद करण्यात येणार आहे. या वेळेत तांत्रिक अडचणींवर काम सुरू राहणार असलं तरीही दुपारी 12 नंतरही सेवा हळूहळू पूर्व पदावर येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.