Home /News /national /

मुंबई-भुवनेश्वर एक्सप्रेसला अपघात, मालगाडीला दिली धडक, 20 प्रवाशी जखमी

मुंबई-भुवनेश्वर एक्सप्रेसला अपघात, मालगाडीला दिली धडक, 20 प्रवाशी जखमी

ओडिशामधील कटकजवळ मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.

    कटक,16 जानेवारी: ओडिशामधील कटकजवळ मुंबई(लोकमान्य तिलक टर्मिनस)-भुवनेश्वर एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. सालागाव आणि नरगुंडी स्टेशन दरम्यान मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसने मालगाडीला जोरदार धडक दिली. एक्स्प्रेसचे 8 डबे रूळावरून घसरले असून या अपघातात 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून स्थानीय नागरिक मदतीसाठी धाऊन आले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सालागाव- नीरगुंडी स्टेशन दरम्यान सकाळी सात वाजता हा अपघात झाला. यात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटन घडली तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूके होते. त्यामुळे अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन नंबर 0674-1072 आणि 0671-1072 जारी केले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या