नवी दिल्ली, 16 जानेवारी : क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता सध्या गौतम गंभीर राजकारणात अग्रेसर झाला आहे. पूर्व दिल्लीमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गंभीरनं लोकसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. मात्र, ट्विटरवरून गंभीरनं एका महिला क्रिकेटपटूची समस्या सोडवली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका महिला क्रिकेटपटूनं प्रशिक्षकाने करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. अखेर गंभीरनं पुढाकार घेत या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला क्रिकेटपटूनं ट्वीट करत भाजप खासदार गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग यांच्याकडे मदत मागितली आहे. या महिला क्रिकेटपटूनं 30 डिसेंबर रोजी या ट्विट करत गौतम गंभीरकडे मदत मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सेहवागकडे मदत मागितली. अखेर गंभीरनं या क्रिकेटपटूचा नंबर मागत तिच्याशी त्वरित संपर्क साधला. वाचा- ऋषभ पंत राजकोट वनडेमधून बाहेर! ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी गंभीरने महिला क्रिकेटपटू मिळवून दिला न्याय स्वत: गौतम गंभीर यांनी ट्वीट करून या आरोपी क्रिकेट प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. गौतम गंभीरने ट्विट केले की, ‘काही दिवसांपूर्वी एका मुलीने माझ्याशी संपर्क साधला आणि मला सांगितले की तिच्यावर प्रशिक्षकाने बलात्काराचा प्रयत्न केला होता. आता तो आरोपी तुरूंगात आहे. माननीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार. वाचा- धक्कादायक…अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ, महिलांनी मुंबईत राहायचं तरी कसं?
वाचा- TikTokने Facebookला मागे टाकलं, एका महिन्याची कमाई वाचून थक्क व्हाल प्रशिक्षकाचे नाव न घेता केली तक्रार दरम्यान या क्रिकेटपटूनं आपली तक्रार करताना या प्रशिक्षकाचे नाव लिहिलेले नव्हते. ट्वीट केलेल्या या पोस्टमध्ये, ”मी दिल्लीची एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक माझा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला तर तो करीअरच उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो. माझ्या प्रशिक्षकाचे संघ निवड समितीतील सदस्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांने माझ्या क्रिकेट करिअरला ब्रेक लावण्याची धमकी देत आहे. कृपया याची दखल घेत मला मदत करा”, असे सांगत गौतम गंभीरला टॅग केले होते.