नवी दिल्ली 14 ऑगस्ट : ऑनलाईन शॉपिंगच्या (Online Shopping) वाढत्या ट्रेंडमध्येच जेवणाचीही मिळणारी होम डिलिव्हरी (Food Home Delivery) अनेकांसाठी फायद्याची ठरते. जे लोक एकटे राहतात आणि ज्यांना स्वतःला जेवण बनवणं येत नाही, अशा लोकांसाठी ऑनलाईन फूड डिलिव्हरी हा उत्तम पर्याय आहे. मात्र, अनेकदा डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीचं कृत्य समोरच्यासाठी त्रासदायक ठरतं. Uber Eats च्या ड्रायव्हरचा असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून ऑनलाईन फूड ऑर्डर करणारे लोक सदम्यात आहेत. या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर रस्त्यावर बसून ग्राहकाच्या ऑर्डरमधून जेवण चोरताना दिसत आहे.
400 तासांमध्ये संपूर्ण शरीर गोंदवलं, या भागावर झाला सुईचा सर्वाधिक त्रास
Uber Eats च्या ड्रायव्हरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो रस्त्याच्या कडेला बसून ऑर्डरमधून थोडं-थोडं जेवण चोरताना दिसत आहे. यातील काही पदार्थ काढून घेतल्यानंतर तो पुन्हा बॉक्स सील करतो आणि डिलिव्हर करण्यासाठी निघतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की या ड्रायव्हर आपल्या हातानं नूडल्स काढून प्लास्टिकच्या एका वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवतो.
नूडल्सनंतर तो चिकनचे काही पीस आणि सूपदेखील त्याच डब्यामध्ये काढून घेतो, ज्यात त्यानं नूडल्स काढले आहेत. यानंतर तो सगळे बॉक्स पुन्हा एकदा सील करून आपली सायकल घेऊन तिथून निघतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर Uber Eats नं कारवाई करत या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढलं आहे आणि ग्राहकाची माफी मागितली आहे.
नवरा-नवरीच्या मध्ये 'हे' काय? स्टेजवर जे दिसलं ते पाहून तुम्ही व्हाल शॉक
अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. याआधीही फूड होम डिलिव्हरी करणाऱ्यांचे असे व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, डिलिव्हरी बॉयचं हे कृत्य पाहून अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Viral news