मराठी बातम्या /बातम्या /Viral /

400 तासांमध्ये संपूर्ण शरीर गोंदवलं, या भागावर झाला सुईचा सर्वाधिक त्रास

400 तासांमध्ये संपूर्ण शरीर गोंदवलं, या भागावर झाला सुईचा सर्वाधिक त्रास

संपूर्ण शरीरच त्याने गोंदवून घेतलं

संपूर्ण शरीरच त्याने गोंदवून घेतलं

स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या यॅनिक रिकने आपल्या चेहऱ्याचा भाग वगळता बाकी संपूर्ण शरीरावर सगळीकडे टॅटूने गोंदवून (Tatto) घेतलं आहे. यामुळे यॅनिकचं संपूर्ण शरीर काळ्या रंगाच्या शाईने रंगवल्यासारखं दिसतं.

मुंबई, 14 ऑगस्ट : जगात अनेक प्रकारचं वेड असलेली माणसं असतात, त्यांना असणाऱ्या छंदांबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं. काही लोकांची कृत्यं खूपच विचित्र असतात. कधीकधी त्यावर विश्वास ठेवणंही आपल्याला कठीण जातं. स्वित्झर्लंडमध्ये राहणारा यॅनिक रिक नावाचा 26 वर्षांचा तरुण त्यापैकीच एक. त्याने आपल्या चेहऱ्याचा भाग वगळता बाकी संपूर्ण शरीरावर सगळीकडे टॅटूने गोंदवून (Tatto) घेतलं आहे. यामुळे यॅनिकचं संपूर्ण शरीर काळ्या रंगाच्या शाईने रंगवल्यासारखं दिसतं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने प्रायव्हेट पार्टवरही (Private Part) टॅटू काढला आहे. संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेण्यासाठी यॅनिकने आतापर्यंत सुमारे 400 तास खर्च केले आहेत. त्याला यासाठी मोठा खर्चसुद्धा आला आहे. आपली ही हौस पूर्ण करण्यात यॅनिकने कोणताही कंजूषपणा केलेला नाही. यॅनिकने टॅटूसाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. टॅटू काढताना शरीराच्या कोणत्या भागाला सर्वांत जास्त वेदना झाल्या, हे त्याने त्याच्या फॉलोअर्सना नुकतंच सांगितलं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, की प्रायव्हेट पार्टवर टॅटू काढताना त्याला सर्वाधिक वेदना झालेल्या नाहीत.

यॅनिकला The Evil Blackwork & Bodymod या नावानेदेखील ओळखलं जातं. त्याने आपल्या पूर्ण शरीरावर काळ्या रंगाच्या शाईने (ink) टॅटू काढले आहेत. याशिवाय यॅनिकने त्याची जीभसुद्धा कापली आहे. यॅनिकला त्याच्या शरीरात विशेष मॉडिफिकेशन करायचं होतं. यासाठी त्याने आपले निपल्ससुद्धा (nipples) कापून घेतले आहेत. यॅनिकला सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रोत्साहित करणारे त्याचे हजारो चाहते आहेत.

'या' भागाला झाल्या सर्वाधिक वेदना

यॅनिकचे चाहते त्याला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारत असतात. अशाच एका युजरने यॅनिकला विचारलं, की टॅटू काढताना त्याच्या शरीराच्या कोणत्या भागाला सर्वांत जास्त वेदना झाल्या? यावर यानिकने दिलेल्या उत्तराने सर्वांना धक्का बसला. यानिकने सांगितलं, की 'तुम्हाला वाटलं असेल, की प्रायव्हेट पार्टवर टॅटू काढणं सर्वांत त्रासदायक आहे; मात्र असं अजिबात नाही. खरं तर तळहातावर टॅटू काढताना सर्वांत जास्त त्रास झाला.'

extreme tattoo lover

हा सगळा अनुभव सांगताना यॅनिकने त्याच्या तळहाताचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये दिसतंय, की यॅनिकने हातावर मागे आणि पुढे अशा दोन्ही भागांवर टॅटू काढला आहे. फक्त नखांवर टॅटू काढलेला नाही. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच त्याच्यावर टीका करणारेही युझर्स आहेत. त्याला अनेक नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा मिळतात; मात्र या गोष्टींचा अजिबात विचारात न करता यॅनिक टॅटू काढून घेण्याचं आपलं काम करतोच आहे.

First published:

Tags: Tattoo