व्हिडिओमध्ये (Dangerous Stunt on Road) बाईकवर दोघेजण जात असल्याचं दिसतं. रस्त्याच्या मधोमध दोघंही आगळावेगळा स्टंट करू लागतात. यात दोन्ही व्यक्ती चालू दुचाकीवरच आपल्या जागेची आदलाबदली करू लागता. बाईकवर मागे बसलेली व्यक्ती पुढच्या सीटवर बसण्यासाठी जाते, तर पुढील व्यक्ती चालू दुचाकीवरच मागच्या सीटवर जाऊन बसते. यादरम्यान दुचाकी रस्त्यावर धावतच असते. दोघेही दुचाकी थांबवत नाहीत. मासे पकडताना अचानक पाण्यातून बाहेर आली मगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO हा स्टंट काळजाचा ठोका चुकवणारा आहे. हे सगळं करत असताना थोडीही चूक झाली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.