मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दोघींचं भांडण पण फायदा मात्र त्याचा! बॉयफ्रेंड कोणाचा यावर भांडत राहिल्या 2 गर्लफ्रेंड, पुढे जे घडलं ते...

दोघींचं भांडण पण फायदा मात्र त्याचा! बॉयफ्रेंड कोणाचा यावर भांडत राहिल्या 2 गर्लफ्रेंड, पुढे जे घडलं ते...

महाराष्ट्रातील विचित्र प्रकरण, बस स्टॉपवरील दोन तरुणींमधील त्या भांडणाची अखेर का होतेय चर्चा?

महाराष्ट्रातील विचित्र प्रकरण, बस स्टॉपवरील दोन तरुणींमधील त्या भांडणाची अखेर का होतेय चर्चा?

महाराष्ट्रातील विचित्र प्रकरण, बस स्टॉपवरील दोन तरुणींमधील त्या भांडणाची अखेर का होतेय चर्चा?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 28 ऑगस्ट 2022 : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जिथे कधी काय समोर येईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. तर कधी आपल्याला चक्रावून सोडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

ही घटना महाराष्ट्रातील एका बसस्थानकावर घडली आहे. मात्र हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. खरंतर बॉयफ्रेंडच्या दोन अफेअरमुळे या मुलींमध्ये जोरदार भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

जेव्हा एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका बसस्टॉपवर बसला होता, तेव्हा त्याची दुसरी गर्लफ्रेंड आली आणि तिने मुलीसोबत आपल्या बॉयफ्रेंडला पाहिले. ज्यानंतर ती आपल्या बॉयफ्रेंडवर हक्क सांगण्यासाठी त्या मुलीसोबत भांडू लागली.  या दोन्ही मुलींमध्ये जोरदार भांडणं झाली, या भांडणाचा फायद उचलून तो तरुण तेथून पळाला. मात्र या मुलींचं भांडण थांबलं नाही.

हे वाचा : गर्लफ्रेंडला मागे बसवून त्यानं बाईक उचलली आणि... जीवघेण्या स्टंटचा पाहा VIDEO

या दोन्ही मुलांचा वाद एवढा विकोपाला गेला की हणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. उपस्थित लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्याच्यासाठी त्या भांडत होत्या तो मात्र त्यांना चुना लावून पसार झाला होता. दोन मुली भांडत असल्याचं पोलिसांना समजलं.

पोलिसांनी तातडीनं मुलींना पोलीस ठाण्यात नेलं. तिथे दोघींची चौकशी झाली आणि समजूत काढून त्यांना घरी सोडण्यात आलं. हा सगळा प्रकार जेव्हा सोशल मीडियावर चर्चेत आला तेव्हा अनेकांना सुरुवातीला धक्का बसला.

हे वाचा : लपूनछपून नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोचा 'तो' VIDEO; सोशल मीडियावर पोस्ट करताच...

आतापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही सिनेमात असे प्रकार पाहिले होते. मात्र खऱ्या आयुष्यात अशी घटना समोर आल्याने चर्चेलाही उधाण आलं. महाराष्ट्रामधील हे भांडण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

.

First published:

Tags: Girlfriend, Top trending, Viral news