मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लपूनछपून नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोचा 'तो' VIDEO; सोशल मीडियावर पोस्ट करताच...

लपूनछपून नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोचा 'तो' VIDEO; सोशल मीडियावर पोस्ट करताच...

(प्रतीकात्मक फोटो)

(प्रतीकात्मक फोटो)

नवऱ्याने बायकोचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 ऑगस्ट : सोशल मीडियावर कपलचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटिझन्स भडकले आहेत. एका नवऱ्याने आपल्या बायकोचा लपूनछपून व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहून बहुतेक युझर्स त्याच्यावर भडकले आहेत. बायकोचा असा व्हिडीओ काढून तो व्हायरल करणाऱ्या नवऱ्याची काही जणांनी शाळा घेतली आहे.

नवरा-बायकोमध्ये असे काही क्षण असतात जे त्यांच्यापुरतेच मर्यादित राहणं चांगलं. मग ते भांडण असो, रोमान्स असो वा एकमेकांसोबत मजामस्ती. या व्यक्तीने असाच क्षण सर्वांसमोर खुला केला. टिकटॉक यूजर निकोचा हा व्हिडीओ आहे, जो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता काही महिला डान्स करताना दिसत आहेत. एक व्यक्ती त्यांचा हा व्हिडीओ रेकॉर्ड करतो आहे. डान्स करता करता एक महिला कॅमेऱ्याकडे पाहताना दिसते. त्यानंतर कॅमेरा फिरवला जातो आणि हातात दारूचा ग्लास घेऊन ते पिताना एक व्यक्ती दिसते. ही व्यक्ती तीच जी या महिलांचा डान्स करताना व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे.

हे वाचा - Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला

आता या व्हिडीओत डान्स करताना जी महिला कॅमेऱ्याकडे पाहते ती या व्यक्तीची बायको आहे.  आपला नवरा आपला व्हिडीओ शूट करतो आहे, हे तिला माहिती नाही आहे. त्याने लपूनछपून तिचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Niko Valdes (@nikovaldes)

त्यासोबत व्हिडीओवर माझी बायको डान्स फ्लोअरवर... किलिंग इट... असा टेक्स्ट दिला आहे. तर कॅप्शनमध्ये मला तिच्यासोबत डान्स का करायचा नसतो याचा ती विचार करत असते, असं म्हटलं आहे.

हे वाचा - Love story : शेजारी बसली आणि बनली गर्लफ्रेंड; कपलची 'बसवाली लव्ह स्टोरी' चर्चेत

एकंदर पत्नीच्या डान्सची त्याने थट्टा केली आहे. नवरा आपल्या बायकोची खिल्ली उडवत असल्याचं म्हणत सोशल मीडिया युझर्सनी त्याला सुनावलं. एकतर त्याने लपूनछपून व्हिडीओ बनवलं आणि नंतर बायकोचंच सर्वांसमोर हसू केलं म्हणून सर्वांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर त्याची बायको क्रिस्टाचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Couple, Social media viral, Viral, Viral videos, Wife and husband