मुंबई 25 ऑगस्ट : सोशल मीडिया हे लोकांच्या मनोरंजनासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. प्रसिद्धीसाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका तरुणाने जीवघेणा स्टंट केला आहे. स्टंट करताना हे लोक स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करत नाही.
सध्या एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण आणि तरुणी गाडीवर बसून धक्कादायक प्रकार करत आहेत. जे करणं त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतं.
नक्की असं काय केलं?
या प्रियकराने आपल्या आपल्या स्कुटीच्या मागे आपल्या प्रेयसीला बसवलं आहे आणि तो रस्त्यावर स्टंटबाजी करत आहे. या प्रियकराने स्कूटी चालवताना अचानक पुढचं चाक उललं आणि फक्त मागच्या चाकावर तो स्कूटी चालू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रियकराच्या मागे त्याची प्रेयसी बसली होती. तसे पाहाता ही तरुणी देखील घाबरली होती, परंतु तरी देखील ती या स्टंटचा आनंद घेत होती.
हे वाचा : Love story : शेजारी बसली आणि बनली गर्लफ्रेंड; कपलची 'बसवाली लव्ह स्टोरी' चर्चेत
नशीबाने या जोडप्यासोबत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, परंतू विचार करा की जर त्यांचा तोल गेला असता, तर हा स्टंट त्यांना किती महागात पडला असता.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आपण प्रेक्षक म्हणून पाहाताना आपण श्वास रोखून पाहात आहे, परंतु या लोकांना आपल्या जीवाची काहीही पर्वा नाही.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट funtaap वरुन शेअर करण्यात आला, ज्याला दोन दिवसातंच 7 हजाराहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी यावर वेगवेगळे कमेंट देखील केले आहे. काही लोक मजेने म्हणत आहेत की, बस इतका विश्वास ठेवणारी प्रेयसी मिळायला हवी, तर एकाने म्हटलं आहे की, खाली पडलीत तर तेच सगळ्यात पहिलं जाईल, ज्यामुळे नुसतं बसण्याचेही वांदे होतील.
हा व्हिडीओ कितीही मनोरंजक वाटत असला तरी तुम्ही असे स्टंट करु नका, ते जीवावर बेतु शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.