व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका तलावात असलेल्या एक दगडावर एक मासा अडकलेला असतो. यामुळे त्याला श्वास घेण्यास भरपूर त्रास होत असतो आणि तो मरणाच्या दारात असतो. यानंतर पाण्याच्या आतून माशाला पाहाणारं एक कासव त्याच्या मदतीसाठी धावून येतं. व्हिडिओ पाहून असं वाटतं की पाण्यातून बाहेर पडलेल्या बेशुद्ध माशाचा कासव चावा घेत आहे आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. उडी मारताच ...; हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही बंजी जम्पिंगचा विचारही करणार नाही शुद्धीवर आल्यावर मासा पुन्हा एकदा प्रयत्न करतो आणि पाण्यात उडी घेतो, ज्यामुळे त्याचा जीव वाचतो. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही थक्क झाले. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. लोक या व्हिडिओ निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी कासवाचं कौतुक केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.