इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आर्टिस्ट या तरुणीच्या पूर्ण हातावर काळा रंग पसरवताना दिसत आहे. तो टॅटू निडल संपूर्ण हातावर फिरवत आहे. यादरम्यान कदाचित वेदनेमुळे तरुणी भिंतीकडे आपला चेहरा करून बसली आहे.View this post on Instagram
पाहता पाहता हा आर्टिस्ट संपूर्ण हात काळ्या रंगाने भरवतो. यानंतर तो हाताच्या मागच्या बाजूला त्रिकोणाकार बनवतो. हे पाहून खरंच असं वाटतं की हा टॅटू नसून हातमोजेच आहेत. उडता उडता एका पक्ष्याचा दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला; आकाशातील शिकारीचा थरारक VIDEO हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 4 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 10 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. यानंतर टॅटू आर्टिस्टने दुसरा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो टॅटूला फायनल टच दिल्यानंतर हात स्वच्छ करताना दिसतो. यानंतर टॅटू आणखीच आकर्षक दिसू लागतो. या व्हिडिओलाही आतापर्यंत 22 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, की लोक अशाप्रकारच्या डिझाईन शरीरावर का बनवत असतील. अनेकांनी तरुणीला सवाल केला की स्वतःचा पूर्ण हात काळा करून घेण्याची इच्छा का झाली?View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.