मुंबई, 14 मार्च : काही व्यक्तींना काहीतरी तुफान करायला खूप आवडतं. असे लोक थरारक खेळ खेळतात, अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटी करताना दिसतात. पण त्यांची ही हौस त्यांच्या जीवावरही बेतू शकते, असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बंजी जम्पिंग करताना एका महिलेसोबत भयंकर दुर्घटना घडली आहे (Shocking Bungee Jumping Video). बंजी जम्पिंग करताना दोरी तुटली आणि महिला कित्येक फुटांवरून खाली कोसळली. व्हिडीओ पाहताच धडकी भरते. अवघ्या 20 सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता महिला बंजी जम्पिंगसाठी शेकडो फूट उंचावर उभी आहे. आपले दोन्ही हात पसरते आणि ती इतक्या उंचावरून खाली उडी मारते. तिच्या पायाला दोरी बांधली आहे. उडी मारतात ती कितीतरी फूट खाली जाते आणि अचानक दोरी तुटते. खाली नदी आहे. दोरी तुटताच महिला थेट नदीत कोसळते. हे वाचा - उडता उडता एका पक्ष्याचा दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला; आकाशातील शिकारीचा थरारक VIDEO व्हिडीओ पाहताच युझर्स हैराण झाले आहेत. बहुतेकांनी आपण असं काही करण्याचा विचारही करणार नाही, असं म्हटलं आहे. तर काही मोजक्याच लोकांनी आपण सेफ्टी गिअर्ससह असं काही ट्राय करू अशी म्हटलं.
@ViciousVideos नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही बंजी जम्पिंग करणार का? असा प्रश्न या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारण्यात आला आहे. हे वाचा - Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी हा व्हिडीओ 2012 सालातील असून झिम्बाब्वेमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. ही महिला जिवंत असल्याचा दावा केला जातो आहे.