नवी दिल्ली 27 ऑगस्ट : कासव (Tortoise) हा एक असा जीव आहे ज्याला लोक अत्यंत सुस्त आणि शांत स्वभावाचा समजतात. टीव्हीवर किंवा प्रत्यक्षातही तुम्ही अनेकदा कासवाला पाहिलं असेल. असं म्हटलं जातं, की कासव हे शाकाहारी (herbivorous) असतं. तर, पाण्यात राहणारे कासव हे सर्वभक्षी असतात. मात्र, तुम्ही कधी कासवाला पक्ष्याची (Bird) शिकार करताना पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक मोठं कासव एका पक्ष्याला पकडताना आणि मारताना दिसतं. कुत्र्याला पाहताच काकांनी बायकोसह पळवली सायकल; शॉकिंग आहे या VIDEO चा शेवट कँब्रिज यूनिव्हर्सिटीनं नुकतंच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतं, की एक मोठं कासव एका पक्षाची शिकार करत आहे. व्हिडिओ पाहून जाणवतं की हे एखाद्या जंगलातील दृश्य आहे. झाडाच्या एका तुटलेल्या फांदीवर एक मोठं कासव चालताना दिसत आहे. कासवासमोर एक पक्षी आहे. या पक्षाला पकडण्याचा कासव प्रयत्न करत आहे. मात्र, पक्षी तिथून उडण्याचा प्रयत्न करत नाहीये. हळूहळू पक्षाकडे जात कासव अखेर या पक्षाला पकडतं. या व्हिडिओला जे कॅप्शन देण्यात आलं आहे, त्यावरुन हे समजतं की कासवानं पक्षाला खाल्लं आहे. मात्र, व्हिडिओ तिथेच संपतो जिथे कासवानं पक्ष्याला पकडलं. हे या व्हिडिओमध्ये दिसत नाही की त्यानं पक्ष्याला खाल्लं की नाही.
Researchers capture on film the unexpected moment when a giant #tortoise – thought to be vegetarian – attacks and eats a tern chick: https://t.co/GsAWXSltRs
— Cambridge University (@Cambridge_Uni) August 23, 2021
Warning: some viewers may find scenes in this film distressing.@Peterhouse_Cam @jstgerlach #Seychelles pic.twitter.com/wOTb7WN9JO
नर्सचा डान्स VIDEO घालतोय धुमाकूळ; व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी घेतली अॅक्शन ही पोस्ट शेअर करत कँब्रिज युनिव्हर्सिटीनं लिहिलं, की अभ्यासकांनी कधीही न दिसणारा एक क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे, ज्यात एक मोठं कासव ज्याला शाकाहारी मानलं जातं, ते एका पक्ष्यावर हल्ला करताना दिसत आहे आणि त्याला खाऊन घेतं. रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे, की पहिल्यांदाच एखादं मोठं कासव अशा पद्धतीनं शिकार करताना दिसलं आहे. हा व्हिडिओ जुलै 2020 मध्ये सेशेल्सच्या एका प्रायव्हेट आयलँडवर शूट केला गेला आहे. इथे तब्बल 3000 हून अधिक कासवं राहतात. या कासवावर अभ्यास करणाऱ्या कँब्रिज विद्यालयाच्या प्रोफेसरनं सांगितलं, की जंगली कासवाचा असा स्वभाव याआधी कधीही पाहिला मिळाला नाही.