नवी दिल्ली 27 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. काही व्हिडिओ इतके इमोशनल (Emotional Videos) असतात की ते पाहताच डोळ्यात पाणी येतं. तर काही व्हिडिओ इतके विनोदी (Funny Videos) असतात की पाहूनच हसू आवरत नाही. असेच काही व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तर, काही व्हिडिओंमुळे वादही निर्माण होतो. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात दिसतं, की एक नर्स रुग्णालयात ड्यूटीवर असतानाच डान्स करू (Dance Video of Nurse) लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, हे प्रकरण सिनियर्सच्या नजरेत येताच नर्सच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. ‘त्या’ ग्रहावर खरंच एलियन्स आहेत? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर अनेकांनी डान्स करणं प्रचंड आवडतं. असे लोक जिथे संधी मिळेल तिथे आपलं टॅलेंट दाखवतात. आजकाल तर प्रत्येकाल मस्ती करायची असते. या नर्सनंही असंच केलं मात्र परिणाम वेगळाच झाला. सोशल मीडियावर सध्या रुग्णालयात ड्यूटीच्या दरम्यान डान्स करणाऱ्या एका नर्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ तेलंगणाच्या राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. व्हिडिओमध्ये दिसतं,की पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये इथे काम करणारी नर्स बुलेट बंदी गाण्यावर डान्स करत आहे. या महिलेच्या आसपास इतरही काही नर्स बसल्या आहेत आणि त्या या डान्सची मजा घेत आहेत.
"బుల్లెట్ బండి" అందరికీ కలిసిరాదులే..
— Vidya Sagar Gunti (@GVidya_Sagar) August 21, 2021
మొన్నో పెండ్లికుతూరు స్టెప్ ఏస్తే తెగ షేర్ చేసారని.. ఈ నర్స్ మ్మ కూడా ట్రై చేసింది. కానీ సీన్ రివర్స్.. పని టైములో గంతులేంటని కలెక్టర్ గుస్సా అయ్యాడంట.. ఫాఫమ్#BulletBandi #nurse #Dance #Song #Bulletsong #Collector #Telangana #AndhraPradesh pic.twitter.com/ooa2fVoPQ6
किक मारून भिंत तोडली पण…, दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO ट्विटरवर @GVidya_Sagar नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नर्सचा हा डान्स नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. ऑन ड्यूटी डान्स करणाऱ्या या नर्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नर्स ज्योतीविरोधात नोटीस जारी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.