मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! तोंडात पाय धरला आणि...; चक्क कासवाने केला कुत्र्यावर खतरनाक हल्ला; VIDEO VIRAL

अरे बापरे! तोंडात पाय धरला आणि...; चक्क कासवाने केला कुत्र्यावर खतरनाक हल्ला; VIDEO VIRAL

कासवाचं कधीच पाहिलं नसेल असं रूप.

कासवाचं कधीच पाहिलं नसेल असं रूप.

कासवाचं कधीच पाहिलं नसेल असं रूप.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 20 डिसेंबर :  कासव (Turtle video) सर्वात शांत आणि हळूहळू चालणारा प्राणी म्हणून त्याची ओळख. सामान्यपणे कासवाला (Tortoise video) आपण आक्रमक झालेलं कधीच पाहिलं नाही. पण अशाच एका आक्रमक कासवाचा एक व्हिडीओ (Tortoise dog video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. या कासवाने चक्क एका कुत्र्यावर हल्ला केला आहे (Turtle dog video).

कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या आक्रमक कासवाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत (Turtle attack on dog). कासवाचं असं रूप कोणी कधीच पाहिलं नसेल (Tortoise attack on dog). कासवही असं असू शकतं, याचंच सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. किंबहुना व्हिडीओ पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही.व्हिडीओत पाहू शकता कासवाने कुत्र्याचा एक पाय आपल्या तोंडात धरला आहे. त्याने आपल्या इवल्याशा तोंडात कुत्र्याचा पाय इतका घट्ट धरला आहे की कुत्राही त्याच्यापासून सुटका करण्यासाठी धडपडत आहे.

" isDesktop="true" id="645617" >

अगदी खेकड्याने करकचून धरावं असं या कासवाने कुत्र्याचा पाय करकचून धरला आहे. कुत्र्याला वेदनाही होताना दिसत आहेत. तो इतक्या मोठ्याने ओरडतो आहे.

हे वाचा - उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO

इतकी धडपड करूनही कासव काही पाय सोडत नव्हता. शेवटी कुत्र्याने कासवाच्या तोंडाला चावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कासवाने हळूच आपलं डोकं आपल्या शरीराच्या आत ओढून घेतलं. तेव्हा कुठे या कुत्र्याच्या कासवाच्या तावडीतून सुटका झाली. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कधीही कुणाला कमजोर समजू नये, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीही कुत्रा आणि कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात कासव कुत्र्याची छेड काढताना दिसला. आरामात बसलेल्या कुत्र्याचा कान कासव चावत होता.

हे वाचा - घोड्यांची WWF! एकाने दुसऱ्याला जमिनीवर धाडकन आपटलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

कुत्र्याने पाहून पाहून घेतलं. सुरुवातीला त्याने कासवाकडे दुर्लक्ष केलं पण नंतर मात्र त्याचीही सटकली आणि त्याने कासवावर हल्ला केला. त्यानंतर कासवाने गप्पपणे आपलं डोकं आपल्या शरीराच्या आत घेतलं.

First published:

Tags: Dog, Other animal, Pet animal, Viral, Viral videos