Home /News /viral /

घोड्यांची WWF! एकाने दुसऱ्याला हवेत उडवत जमिनीवर धाडकन आपटलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

घोड्यांची WWF! एकाने दुसऱ्याला हवेत उडवत जमिनीवर धाडकन आपटलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

घोड्यांची अशी फायटिंग पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

  मुंबई, 18 डिसेंबर : घोडे (Horse video)  म्हणजे वेगाने पळणारे. त्यामुळेच घोड्यांची रेसिंग स्पर्धाही लावली जाते. घोड्यांचे रेसिंगचे (Horse race video) तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील पण कधी घोड्यांना फायटिंग (Horse fighting video)  करताना पाहिलं आहे का? बरं आता घोडे कशी फाइट करतील असं विचारलं तर साहजिकच एकमेकांना ते लाथा मारतील. पण सध्या घोड्यांच्या फायटिंगचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल (Viral video) होतो आहे जो पाहून तुम्ही अवाक व्हाल. एरवी रेसिंग करताना दिसणाऱ्या घोड्यांमध्ये चक्क WWF चं रंगली. घोड्यांची अशी जबरदस्त फायटिंग तुम्ही कधीच पाहिली नसेल. दोन घोडे अगदी माणसांप्रमाणे लढताना दिसले.
  View this post on Instagram

  A post shared by طبیعت (@nature27_12)

  व्हिडीओत पाहू शकता दोन घोडे आहेत. एक काळ्या रंगाचा आणि एक ब्राऊन रंगाचा घोडा आहे. सुरुवातीला ब्राऊन रंगाचा घोडा एका ठिकाणी उभा आहे. काळ्या रंगाचा घोडा त्याच्या दिशेने धावत येतो. त्यावेळी ब्राऊन रंगाचा घोडा त्याच्याकडे पाठ करत आपले मागील दोन्ही पाय त्याच्यावर उडवताना दिसतो. लाथेने त्या घोड्याला मारण्याचा प्रयत्न तो करतो. त्यानंतर संधी मिळताच तो मागे वळतो आणि आपल्या पुढील दोन्ही पायांनी त्या घोड्याला उचलतो आणि हवेत उडवत एकाच फटक्यात जमिनीवर धाडकन आपटतो. हे वाचा - अद्भुत! हे सुकलेलं पान नाही तर आहे बेडुक; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO घोड्यांची ही फायटिंग पाहून हैराण झालात नाही. ही फायटिंग पाहताच तुम्हाला माणसांच्या WWF ची नक्कीच आठवण झाली असेल. जसं एक फायटर दुसऱ्या फायटरला जमिनीवर आदळतो. पण प्राण्यांमध्ये अशी फायटिंग पाहताना आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. nature27_12 इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स शॉक झाले आहे. त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Other animal, Pet animal, Viral, Viral videos

  पुढील बातम्या