जाहिरात
मराठी बातम्या / Viral / उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO

उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO

उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO

उंदराला खाणारे कावळे तुम्ही पाहिले असतील पण कधी उंदराला वाचवणारा कावळा पाहिला आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : कावळ्याची (Crow video) हुशारी आपण लहानपणी गोष्टीत वाचलीच आहे. आता तर सोशल मीडियावर (Social media) कावळ्याच्या हुशारीचे असे व्हिडीओही व्हायरल (Viral video) होत असतात. गोष्टीतील कावळा आपण व्हिडीओत प्रत्यक्षात पाहतो. कावळ्याच्या स्मार्टनेसला तोड नाहीच पण कधी कोणत्या कावळ्याला कुणाचा जीव वाचवताना पाहिलं आहे का? (Crow saved rat video)  सध्या अशाच एका कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका कावळ्याने चक्क एका उंदराचा जीव वाचवला आहे. रस्त्यावर उंदराचा जीव वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड पाहायला मिळाली. तसं  रस्त्यावर तुम्ही कावळ्यांना उंदरांभोवती पाहिलं असेल. रस्त्यावर एखादा उंदीर मृत दिसला की त्याच्याभोवती बरेच कावळे जमा होतात. पण ते त्याला खाण्यासाठी पण हा कावळा मात्र उंदराला वाचवताना दिसला.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर बऱ्याच गाड्या जात आहेत. तिथंच एक कावळा आणि उंदीर आहे. उंदीर रस्ता ओलांडून पुढे जात असतो. पण गाड्याने वेगाने जात असतात. उंदराच्या मागे असलेला कावळा उंदरावर आणि गाड्यांवर लक्ष ठेवून आहे. जसा उंदीर पुढे जातो आणि गाडी येते, तसा कावळा त्या उंदराच्या शेपटीला चोचीत धरून त्याला मागे खेचतो. उंदीर पुन्हा पुढे जातो तसा कावळा त्याला पुन्हा मागे खेचतो. उंदराच्या अंगावरून गाडी जाऊन त्याचा जीव जाऊ नये, यासाठी कावळा वारंवार प्रयत्न करताना दिसतो. हे वाचा -   घोड्यांची WWF! एकाने दुसऱ्याला जमिनीवर धाडकन आपटलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO organik.paylasimlar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात