अहमदनगर, 11 मे : गाई-म्हशींचं दूध काढायचं म्हटलं की हाताचा वापर करावा लागतो. काही ठिकाणी मशीननेही गाईचं दूध काढलं जातं (Cow milk video). पण सध्या अशा एका गाईची चर्चा आहे, जिचं दूध हाताने किंवा मशीनने काढण्याची गरजच नाही. खाली भांडं ठेवताच ही गाय स्वतःच दूध देते. भांडं धरताच दूध देणाऱ्या या गाईचा व्हिडीओही समोर आला आहे (Cow give milk After put pot below udder).
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातील ही गाय. शेतकरी मगन किसन भारूड यांनी 6 महिन्यांपूर्वी एक जर्सी गाय खरेदी केली. महिनाभरापूर्वी या गाईने वासराला जन्म दिला. पण तिचं दूध काढण्यासाठी सडाला हात लावण्याची गरज पडत नाही. भारूड या गाईच्या सडाखाली भांडं ठेवतात आणि आपोआप दूध निघतं.
जसं सेन्सर असलेल्या एखाद्या नळाखाली हात धरल्यानंतर त्यातून पाणी यावं तसं या गाईच्या खाली भांड धरल्यानंतर दूध येताना आपण या व्हिडीओत पाहू शकतो.
अहमदनगरमधील या गाईची सर्वत्र चर्चा; सडा खाली भांडं ठेवताच देते दूध. pic.twitter.com/hrVaQ3mYhd
— News18Lokmat (@News18lokmat) May 11, 2022
गाईचं आपोआप दूध निघताना पाहिल्यानंतर भारुड कुटुंबालादेखील आश्चर्य वाटलं. शेतकरी भारूड यांनी सांगितलं, गाईच्या सडाखाली भांड ठेवूनच 4 ते 5 लीटर दूध मिळतं. गेले 20 दिवस ती दररोज संध्याकाळी एका वेळेला इतकं दूध देते.
हे वाचा - चालकाशिवाय आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video
याबाबत अधिक माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे यांनी सांगितलं, गाईने वासराला जन्म दिल्यानंतर लूझ मिल्कर असल्याने असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे हा चमत्कार वगैरे नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखं किंवा घाबरून जाण्यासारखं काहीच नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Cow science, Pet animal, Viral, Viral videos