मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! एकमेकांना वाचवता वाचवता घडली भयंकर दुर्घटना; अपघाताचा थरारक VIDEO

बापरे! एकमेकांना वाचवता वाचवता घडली भयंकर दुर्घटना; अपघाताचा थरारक VIDEO

ट्रक आणि स्कूटीचा भयंकर अपघात.

ट्रक आणि स्कूटीचा भयंकर अपघात.

दोन स्कूटी आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 ऑक्टोबर : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एकमेकांना वाचवताना आणि रस्ता देताना भयंकर दुर्घटना घडली आहे. दोन स्कूटी आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच अंगावर काटा येईल.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक तरुणी स्कूटीवरून जात असत. त्याचवेळी दुसऱ्या रस्त्याने दुसरी तरुणीही स्कूटीवरून येत असते आणि ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. दोघीही एकमेकांनी पाहून थोडं थांबवण्याऐवजी किंवा ब्रेक मारण्याऐवजी आपल्या गाड्या सरळ पुढे नेतात. सरळ रस्त्याने येणारी तरुणी वळणाने येणाऱ्या तरुणीला रस्ता द्यायला म्हणून स्वतःची दिशा बदलते. रस्ताच्या मधोमध ती जाते. तर दुसरी तरुणीही आपली गाडी पुढे नेते. त्याचवेळी दोघींच्या गाडीची टक्कर होते आणि दोघीही स्कूटीसह रस्त्यावर पडतात.

हे वाचा - पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडला आणि झाली भयंकर दुर्घटना; धडकी भरवणारा VIDEO

त्याचवेळी समोरून एक भलामोठा ट्रक येतो. ट्रकचालक रस्त्यावरील हा अपघात पाहतो. स्कूटीवरून पडलेल्या तरुणी आपल्या ट्रकखाली चिरडू नये यासाठी तो प्रयत्न करतो.  त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तो ट्रक वळवायला जातो आणि तेव्हाच ट्रकही पलटी होतो. ट्रकमध्ये वाळू असते जी पूर्ण रस्त्यावर पडते आणि या वाळूखाली दोन्ही तरुणी दबल्या जातात. ट्रकचालही लगेच बाहेर येतो.

सुदैवाने या व्हिडीओत ट्रकचालक सुखरूप दिसतो आहे. तर वाळूखाली असलेल्या तरुणांच्या शरीराची हालचाल दिसते आहे. यावरून त्या जिवंत आहे. पण अपघात पाहता त्यांना गंभीर दुखापत नक्कीच झाली असावी.

हे वाचा - Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत...

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @YoufeckingIdiot ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फक्त 12 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. जो पाहूनच धडकी भरेल. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तरुणी थांबल्या का नाहीत, किंवा त्यांनी ब्रेक का मारला नाही, असा प्रश्न बरेच युझर्स विचारत आहेत.

First published:

Tags: Accident, Viral, Viral videos