Home /News /viral /

स्वत:चाच मास्क चावू लागला प्रवासी; विमानातील गोंधळाचा VIDEO सोशल मीडियावर Viral

स्वत:चाच मास्क चावू लागला प्रवासी; विमानातील गोंधळाचा VIDEO सोशल मीडियावर Viral

कदाचित सतत मास्क लावून लावून त्याची अशी अवस्था झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

    वॉशिंग्टन, 11 सप्टेंबर : कोरोना काळात (Using Mask In corona Pandemic) मास्कचं महत्त्व काय आहे याचा तुम्हाला अंदाजही नसेल. मात्र असं असतानाही अनेक विचित्र घटना समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत (Social Media Viral Video) आहे. हा व्हिडीओ अमेरिकन एअरलाइन्समधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये विमानातील प्रवासी अचानक मास्क चावू लागला. येथील दुसऱ्या एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (traveler began to bite his own mask VIDEO of the plane crash went viral on social media) जेरेमी हॅरिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका वृत्तानुसार त्याच्यासमोर एक आशियन महिला बसली होती. टीम तिला टाकून बोलू लागला आणि म्हणाला की, तू येथून नाहीस त्यामुळे आपल्या देशात निघून जा. जेव्हा फ्लाइट लँड झाली त्यानंतर पोलिसांनी टिमला अटक केली. या फ्लाइटमध्ये 162 प्रवासी प्रवास करीत होते. यातील आरोपी टिम हा 61 वर्षांचा असून तो लास वेगास येथील राहणारा आहे. हे ही वाचा-महिलेनं BF ला दिलं 17 पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट लेटर; डेटवर जाण्याआधी अजब मागणी अमेरिकन एअरलाइन्सची फ्लाइट 1802 लॉस एंजेलिसहून निघाल्यानंतर ही घटना घडली. यादरम्यान टिम अचानक सह प्रवाशांना त्रास देऊ लागला. सुरुवातीलाच टिमने एका क्रू मेंबर्ससोबत वाद घातला. यादरम्यान रागाच्या भरात तो आपला मास्क खेचू लागला आणि तो चावू लागला. या दरम्यान टिम राष्ट्राध्यक्ष जो बायडेन..जो बायडेन नावाचे ओरडू लागला.  सोशल मीडियावर या व्हिडीओवर राग व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओ संतप्त प्रतिक्रिया दिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Travel by flight, Viral video.

    पुढील बातम्या